वारजे माळवाडी पोलीस हे आपल्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना, पोलिसांना
कॅनाल रोड, खानमज्जीद जवळ लाल रंगाच्या मोटारसायकल सह एक संशयीत मुलगा थांबलेला दिसला सदर मुलाला वाहना बद्दल विचारले असता तो उडवा उडवी चे उत्तर देऊ लागला पोलिसांना संशय आल्याने त्याला वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे आणून चौकशी केली सदर मुलाकडे असलेली दुचाकी वाहन ही चोरीची आहे असे समजले, नमुद संशयीत मुलगा हा विधीसंघर्षीत बालक असल्याचे निष्पन्न झाले. मुलाच्या पालकांना बोलावून घेऊन त्यांच्यासमोर चौकशी केली असताना, वाहन चोरी संदर्भात मुलाला विचारले त्याने मौजमजेसाठी चोरी केली असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचे ताब्यातुन वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले एकुन १० मोटार सायकल व १ कॅप्टन कंपनीचा ट्रॅक्टर जप्त करण्यात येवुन त्यांचे कडून वारजे माळवाडी, हिंजवडी, सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, अलंकार, पर्वती या पोलीस स्टेशन कडील एकुन ११ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. एकुन ५ लाख, १५ हजार, रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहे.
दिनांक १०/०४/२०२४ रोजी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर चे हद्दीमध्ये वरिष्ठांचे आदेशाने पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलीस अंमलदार हे गुन्हे प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना त्यांना पेट्रोलिंग दरम्यान कॅनाल रोड, खानमज्जीद जवळ एका लाल रंगाच्या मोटारसायकल हिचे सह एक संशयीत मुलगा थांबलेला मिळुन आल्याने त्यास त्याचे नाव, पत्ता व गाडीच्या कागद पत्रां बाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याचेवर संशय आला. त्यामुळे त्यास अधिक चौकशीकामी वारजे पोलीस स्टेशन येथे घेवुन आले असता सदर बाबत वरिष्ठांना माहिती देवुन तपास पथकाचे अधिकारी यांनी त्याचे कडे अधिक विचारपुस केली असता नमुद संशयीत मुलगा हा विधीसंघर्षीत बालक असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याचे ताब्यातील मिळुन आलेली दुचाकी ही वारजे माळवाडी पोलीस ठाणे गुरनं ८६/२०२४ भादंवि कलम ३७९ मधील वारजे जकात नाका पुणे भागातून त्याने चोरी केलेली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेकडे त्याचे पालकांचे समक्ष अधिक विचारपुस केली असता त्याने यापुर्वी आजुबाजुच्या परीसरातुन अजुन काही गाड्या चोरी केल्याचे सांगितले. तसेच सदरच्या गाड्या चोरी का केल्या त्याबाबत त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सदरच्या गाड्या ह्या फक्त मौजमजेसाठी चोरी केली असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचे ताब्यातुन वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले एकुन १० मोटार सायकल व १ कॅप्टन कंपनीचा ट्रॅक्टर जप्त करण्यात येवुन त्यांचे कडून वारजे माळवाडी, हिंजवडी, सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, अलंकार, पर्वती या पोलीस स्टेशन कडील एकुन ११ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास रामेश्वर पार्वे, पोलीस उपनिरीक्षक वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ - ३ श्री संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त कोथरुड विभाग श्री भिमराव टेले वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनोज शेडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री निळकंठ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक रणजीत मोहिते, पोलीस उप निरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, भुजंग इंगळे, मनोज पवार, विजय भुरुक, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी, संभाजी दराडे, अजय कामठे, सत्यजित लोंढे यांनी केली आहे.
0 Comments