शहरातील सर्व नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येते की, होळी निमित्ताने कोणत्याही वृक्षांची तोड करू नये. कोणतीही व्यक्ती विनापरवाना वृक्ष तोडीत असल्यास किंवा विस्तार कमी करीत असल्यास, कृपया संबंधित क्षेत्रिय कार्यालयाचे मा. महापालिका सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी/वृक्ष प्राधिकरण कार्यालय, पुणे महानगरपालिका, यांचेकडे तक्रार करावी
पुणे महानगरपालिका अधिकार क्षेत्रास महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम १९७५ चा कायदा लागू करण्यात आला आहे.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५, महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्षसंरक्षण व संवर्धन नियम २००९ व मे. उच्च न्यायालय, मुंबई यांचे दिनांक २० सप्टेंबर २०१३ रोजीच्या आदेशान्वये, वृक्ष प्राधिकरणाचे कामकाज करण्यात येते.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) अधिनियम २०२१, या कायद्यानुसार विनापरवाना झाडे जाळणे, तोडणे किंवा कोणत्याही प्रकारे झाडास हानी पोहचवणे असे कोणतेही कृत्य करणे हा गुन्हा आहे. अश्या गुन्हास "शासनाद्वारे अधिसुचित करण्यात येईल अशा पद्धतीचा वापर करून, काढलेल्या मुल्याइतके परंतू, एक लाख रूपयांपेक्षा अधिक नसेल इतक्या रकमेच्या दंडाची शिक्षा आहे."
तथापि शहरातील सर्व नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येते की, होळी निमित्ताने कोणत्याही वृक्षांची तोड करू नये. कोणतीही व्यक्ती विनापरवाना वृक्ष तोडीत असल्यास किंवा विस्तार कमी करीत असल्यास, कृपया संबंधित क्षेत्रिय कार्यालयाचे मा. महापालिका सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी/वृक्ष प्राधिकरण कार्यालय, पुणे महानगरपालिका, यांचेकडे तक्रार करावी किंवा टोल फ्री क्रमांक १८००१०३०२२२, व्हॉटस अॅप क्रमांक ९६८९९००००२ यावर किंवा www.complaint. punecorporation.org या तक्रार पोर्टलवर अथवा एस.एम.एस. अॅलर्ट या भ्रमणध्वनी सेवा क्र. ९२२३०५०६०७ यावरही विनाविलंब एस. एम. एस. करावा.
0 Comments