श्री.संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन,
दिनांक २१/०३/२०२४ रोजी कोंढवा पोलीस स्टेशन हददीतील आगामी लोकसभा निवडणुक २०२४ व रमजान ईद, रंगपंचमी, होळी, शिवजयंती, गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, असे विविध धर्मांचे धार्मीक सणाच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन हददीत रुट मार्च घेण्यात आला.
सदर रूट मार्च चे आधी सर्व अधिकारी व अंमलदार यांना सदर आगामी बंदोबस्त अनुषंगाने सुचना देण्यात आल्या.

त्यानंतर तसेच आगामी सण उत्सवानिमित्त उपस्थित असलेल्या अधिकारी व अंमलदार व सी.आय .एस.एफ प्लाटुन यांच्यासह कोंढवा पोलीस स्टेशन येथुन ५.४० वा. सुरु करुन डावीकडे वळुन कोंढवा वाहतुक विभाग-डावी कडे वळुन-तुबा मस्जिद-डावी कडुन वळुन-सिटी लॉन्स पारगेनगर-ओमाकार गार्डन- वेल कम हॉल चौक-सरळ जाफरान हॉटेल कडुन उजवीकडे वळुन लाईफ लाईन हॉस्पीटल-पुढे सरळ मदीना हॉटेल चौक डावी कडे वळुन सरळ कौसरबाग मस्जीद-सरळ सुप्रीम हॉटेल चौक -सरळ एनआयबीएम रोड-डावी कडे वळुन सरळ मेफेर एलिंगजा सोसायटी चौक-सरळ ज्योती चौक-डावी कडे वळुन-सरळ भिमनगर-विठ्ठल मंदीर-भैरवनाथ मंदीर कोंढवा गावठाण कोणार्कपुरम सोसायटी-बादशह नगर सोसायटी- सत्यानंद हॉस्पिटल-आशिर्वाद चौक-शितल पेट्रोलपंप अशोका म्युज सोसायटी-सरळ कोंढवा पोलीस स्टेशन येथे १८/४५ वा पर्यंत रुट मार्च घेण्यात आला.

सदर रूट मार्च हा मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५. श्री. आर. राजा मा. सहा, पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. मानसिंग पाटील तसेच सी.आर. मोबाईल, तपास पथक पोलिस अधिकारी व पोलीस स्टेशन कडील पोलिस अंमलदार, सी.आय.एस.एफ प्लाटुन, यांचे उपस्थितीत पार पडला.