खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखेकडील पोलीस पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की एक इसम मोकळ्या मैदानात कर्वेनगर येथे पिस्टल बाळगून थांबला
आहे, त्याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तेथे जाऊन सापळा रचून संशयित इसमास शिताफीने ताब्यात घेतले,
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला पाठीमागे १ देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळून आल्याने सदर आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २२/०३/२०२४ रोजी खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम भुजबळ बंगल्याच्या बाजूस मोकळ्या मैदानात कर्वेनगर येथे पिस्टल बाळगून थांबला असल्याची माहिती मिळाली.
त्याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तेथे जाऊन सापळा रचून संशयित इसमास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सुरज रोहिदास खंडागळे, वय ३० वर्षे, रा. म्हाडा कॉलनी,वारजे, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला पाठीमागे १ देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळून आल्याने सदर आरोपी विरूद्ध अलंकार पो स्टे गु.र.नं. ५०/२०२४ आर्म अॅक्ट ३(२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त १, गुन्हे शाखा श्री. सुनिल तांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. क्रांतीकुमार पाटील, सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस अंमलदार विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, नितीन कांबळे, रविंद्र फुलपगारे, प्रविण ढमाळ, संजय भापकर अमोल आवाड यांनी कारवाई केली आहे.
0 Comments