मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर. मुंढवा पोलिसांची कामगिरी तडीपार आरोपीकडून १ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुस सह आरोपीला अटक.


मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पेट्रोलिंग करीत असताना, पोलिसांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील तडीपार आरोपी हा लोणकर पेट्रोल पंपा शेजारी केशवनगर येथे थांबला आहे, मुंढवा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून   १ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुस मिळून आल्याने मुंढवा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे, पुढील तपास पोलीस करत आहेत.

मा. पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, पुणे शहर यांचे मार्गदर्शक सुचना प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी मुंढवा पोलीस ठाणे कडील तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, आण्णासाहेब टापरे व अंमलदार स्टाफ रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी, पाहिजे/फरारी, तडीपार आरोपी शोध तसेच गुन्हे प्रतिबंधक करणेकरीता पेट्रोलिंग करून प्रभावी कारवाई करणे करीता सुचना देवून पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात पेट्रोलींग कामी रवाना केले.

पेट्रोलिंग करत असताना सायं.६ वा. चे सुमारास लोणकर चौक, केशवनगर भागामध्ये पेट्रोलींग चालू असतांना पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली "मुंढवा पोलीस ठाणे रेकॉर्डवरील व सध्या तडिपार असणारा गुन्हेगार इसम नामे तेजस कुपेंद्र पायगुडे रा. केशवनगर मुंढवा पुणे हा लोणकर पेट्रोलपंपाचे मागे आला असल्याची माहिती प्राप्त झाली." अशी बातमी प्राप्त झाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांना दिली असता त्यांनी बातमीची खातरजमा करून, बातमीप्रमाणे प्रकार मिळून आलेस योग्य ती कायदेशीर ठोस कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे घटनास्थळी जावुन योग्य सापळा लावून खातरजमा केली असता बातमी खरी असल्याची खात्री झाल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात घेतले. सदरचे इसमाने मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर यांचेकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६(१) (अ) (ब) चा भंग केला असल्याने त्यास पुढील कायदेशिर कारवाई करीता ताब्यात घेणे गरजेचे असल्याने सहा. पोलीस निरीक्षक, आण्णासाहेब टापरे यांनी त्याची झडती घेतली असता त्याचे कमरेस एक गावठी कट्टा मिळुन आला व अधिक झडती घेतली असता त्याचे पँटचे उजव्या खिशा मध्ये दोन काडतुस (राऊंड) मिळुन आले.


सदर इसम नामे तेजस कुपेंद्र पायगुडे रा. केशवनगर मुंढवा पुणे हा तडीपार असतांना देखील आदेशाचा भंग करुन गावठी कट्टा व राऊंडसह फिरत असल्याने सरकार तर्फे कायदेशिर फिर्याद देवून मुंढवा गुन्हा रजि. नंबर ९४/२०२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२, व आर्म अॅक्ट कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे.

अटक आरोपींचे पूर्व रेकॉर्ड: तेजस कुपेंद्र पायगुडे वय २७ रा. लोणकरवस्ती केशवनगर मुंढवा पुणे. याचे विरुद्ध दखलपात्र ४ गुन्हे, अदखलपात्र १ गुन्हे. असे गुन्हे नोंद आहेत.

सदरची कामगिरी, मा. पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, पुणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे, मा. पोलीस उप- आयुक्त, आर राजा, परिमंडळ-५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त, आश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, सहा. पोलीस निरीक्षक, आण्णासाहेब टापरे, सहा. पोलीस फोजदार, संतोष जगताप, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्ग, संतोष काळे, महेश पाठक, राहूल मोरे, हेमंत झुरुंगे, सचिन पाटील यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments