दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा यांना माहिती मिळाली की एक इसम देशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी
कात्रज कोंढवा रोड या ठिकाणी येऊन थांबला आहे,बातमी मिळताच पोलिसांनी बातमीच्या ठिकाणी सापळा रचून सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात १ गावठी बनावटीचे पिस्टल व ३ जिवंत काडतुसे असा एकुण ४० हजार,६००/-रुपये किमतीचा माल मिळुन आल्याने त्यांचेवर कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.
दि.२९/०२/२०२४ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ चे अधिकारी व अंमलदार हडपसर, वानवडी व कोंढवा पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, शिवानंद हॉटेल जवळील, साई गादी कारखाना समोर, खराडी, पुणे येथे अहमदनगर विसापूर जेल मधील पॅरोल रजेवर सुटलेला व पॅरोल रजा संपलेली असताना पुन्हा जेल मध्ये हजर न झालेला एक आरोपी इसम हा कात्रज-कोंढवा नविन काम चालु असलेल्या रोडवरील हॉट मिक्स प्लॅट जवळ, कोंढवा, पुणे येथे पिस्टल विक्री करण्याकरीता कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे.
त्याप्रमाणे वरिष्ठ अधिकारी यांचे आदेशाप्रमाणे सदर ठिकाणी जावुन, शिताफीने सदर इसमांना ताब्यात घेवुन, त्यास त्याचा नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव व पत्ता प्रदीप ऊर्फ शप्पु जर्नादन कोकाटे, वय ३४ वर्षे, रा. वाघ मळा, करंदीकर हॉस्पीटल शेजारी, विठ्ठलवाडी, अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात ०१ गावठी बनावटीचे पिस्टल व ०३ जिवंत काडतुसे असा एकुण ४०,६००/- रु. किं.चा माल मिळुन आल्याने त्यांचेवर कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजि. नं. २२५/२०२४ आर्म अॅक्ट कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. प्रविण पवार, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे, सहा. पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, व पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे, विनायक रामाणे, दिनकर लोखंडे, गणेश लोखंडे, राहुल इंगळे, सुदेश सपकाळ यांनी केली आहे.
0 Comments