पुणे- मुंढवा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, गावठी हातभट्टीची दारूच्या ३८ कैन, व १ चार चाकी वाहन, असा एकूण ३ लाख, २५ हजार, ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

मुंढवा पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक चार चाकी वाहन भरधाव वेगाने जात आहे याचा पोलिसांना संशय आला, पोलिसांनी हा प्रकार वरिष्ठांना कळवले मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, यांनी ताबडतोब गाडी ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून गाडी अडवली असता, गाडीमधील एक किसन लोखंडी कोयता घेऊन आला गाडी आडवायची नाही, असे सांगून कोयता हवेत  फिरवू  लागला, पोलिसांनी शिताफीने त्यास लोखंडी कोयत्यासह दोघांना ताब्यात घेतले
आणि गाडीची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये हातभट्टी दारूचे ३८ कैन मिळून आले, या संदर्भात मुंढवा पोलिसांकडून  २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मा. पोलीस आयुक्त, अमितेश कुमार यांनी अवैध धंदे बंद करणे करीता नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अवैध धंद्यावर आळा बसण्यासाठी संपूर्ण पुणेकरांना सोशल मिडीया यामाध्यमातुन फेसबुक, इन्टाग्राम, व्हॉटस्अप, पत्रकार मुलाखत इत्यादी माध्यद्वारे अवाहन करण्यात आले होते, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे सुचना प्रमाणे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मुंढवा पोलीस ठाणे यांनी देखील स्थानिक नागरिक, व्यवसाईक, सोसायटी धारक यांच्या बैठक घेवून अवैध धंदे निदर्शनास येताच पोलीस दलास त्याबाबत माहिती द्यावी असे अवाहन केले होते.

दिनांक २२/०३/२०२४ रोजी मुंढवा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणारे नागरिक यांचे मार्गदर्शक सूचना प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मुंढवा पोलीस ठाणे यांनी दि.०७/०२/२०२४ रोजी ९ वा. मुंढवा पोलीस ठाणे कडील रात्रगस्त अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, विलास सुतार, तपास पथक अंमलदार यांना पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी, पाहिजे/फरारी आरोपी शोध तसेच गुन्हे प्रतिबंधक करणेकरीता पेट्रोलिंग करून प्रभावी कारवाई करणे बाबत सूचना देवून पेट्रोलींग कामी रवाना केले.

दिनांक २२/०३/२०२४ रोजी पहाटे ४ वा. चे दरम्यान मुंढवा पोलीस ठाणे कडील रात्रगस्त अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक माळी, तपास पथकाचे अंमलदार, पोलीस मित्र असे झेड कॉर्नर परिसरात पेट्रोलींग करोता असतांना एक महींद्रा कंपनीची मॅक्झीमा पिकप गाडी वेगात गेलेने सदर गाडीचा संशय आल्याने तपास पथकातील अंमलदार व पोलीस मित्र यांनी खाजगी वाहनाने पाठलाग करुन गाडीस थांबविले असता सदर गाडी चालक याने लोखंडी कोयता दाखवून गाडी आडवायची नाही. तेव्हा मुंढवा पोलीस ठाणे कडील आम्ही पोलीस असल्याची माहिती दिल्याने लोखंडी हत्यार तेथेच टाकुन गाडीतील इसमासह पळून जाऊ लागल्याने मुंढवा पोलीस ठाणे पोलीसांनी पाठलाग करुन काही अंतराब त्यांना पकडले. संशय असल्याने सदरचे वाहन चेक केले असता प्लास्टिकचे जूम भरलेले असल्याचे दिसल्याने चौकशी करुन खात्री केली असता गावठी हातभट्टीची दारु असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. सदर घटनेची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मुंढवा पोलीस ठाणे यांना प्राप्त होताच त्यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले.

सदरवेळी सहा. पोलीस निरीक्षक, संजय माळी यांनी कायदेशिर कारवाई करुन १) विलास बाबासाहेब चव्हाण रा. काळेपडळ हडपसर पुणे २) बापू अशोक जाधव रा. लोणकर बस्ती मुंढवा पुणे यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई दरम्यान १) २,००,०००/-रु. कि.ची एक महींद्रा कंपनीची मॅग्झिमा चारचाकी गाडी, २) १,२५,४००/-रु. कि.चे वेगवेगळया रंगाचे एकुण ३८ कैन साधारण एका कॅनमध्ये ३० लीटर क्षमता असलेले त्यामध्ये ११४० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारु ३) २००/- रु. किं.लोखंडी कोयता असा एकुण अंदाजे ३,२५,६००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध दारु मधील सी.ए. तपासणी करीता सैम्पल घेवून इतर अवैध दारु मा. वरिष्ठांचे आदेशाने नाश करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी, मा. पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, पुणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे, मा. पोलीस उप-आयुक्त, आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त, आश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाबासाहेब निकम, सहा. पोलीस निरीक्षक, संजय माळी, सहा. पोलीस निरीक्षक, आण्णासाहेब टापरे, सहा. पोलीस फौजदार, संतोष जगताप, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्ग, संतोष काळे, महेश पाठक, राहूल मोरे, योगेश गायकवाड, निलेश पालवे, स्वप्निल रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील व इतर टिम यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments