कोंढवा पोलीस स्टेशन- पुणे शहर. जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला कोंढवा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे,ऑक्टोंबर 2023 पासून आरोपी हा फरार होता.

बलात्कार जीवे मारण्याची धमकी देणे यासारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला आरोपी हा कोंढवा त्याच्या घरी येणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती, या संदर्भात पोलिसांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांना माहिती दिली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आरोपीला ताबडतोब अटक करण्याचे आदेश दिले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कोंढवा परिसरामध्ये सापळा रचला, आरोपीला चाहूल लागली की पोलीस आपल्याला पकडायला येत आहे, आरोपीने तेथून पळ काढला आरोपीचा पाठलाग करून अमोल हिरवे व शशांक खाडे यांनी आरोपीला अटक केली आहे. ऑक्टोंबर 2023 पासून आरोपी हा फरार होता.

कोंढवा पोलीस स्टेशन कडील पाहिजे आरोपींचा शोध घेणे कामी मा.संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक,कोंढवा पोलिस स्टेशन यांनी आदेशित केले असता. आज दि 21/03/2024 रोजी कोंढवा पोलिस स्टेशन गु  र न 1073/2023 भा द वि कलम 376 2 एन, 323,504,506,34 मधील आरोपी अश्रफ शेख याचा शोध घेत असता  पोलिस हवालदार अमोल हिरवे व पोलिस अम शशांक खाडे  यांना त्यांचे बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे अश्रफ शेख वय 22 वर्ष हा सदर गुन्हा केल्यापासून 2023 पासून आज पावतो फरार असून.तो आज त्याचे राहते घरी शिवनेरी नगर ,कोंढवा, पुणे येथे येणार आहे. त्यानुसार सदर बाब वरिष्ठांना कळवून लागलीच आरोपी अश्रफ शेख यास ताब्यात घेण्यात आले.

सदर कामगिरी मा. अमीतेश कुमार पोलिस आयुक्त, मा.मनोज पाटील अप्पर पोलिस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग, मा.ए राजा पोलिस उप आयुक्त,परिमंडळ 5, मा. गणेश इंगळे मा.सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे, मा. संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक,  कोंढवा पोलिस स्टेशन, ,मा. मनसिंघ पाटील साहेब पोलिस निरीक्षक गुन्हे कोंढवा यांचे मार्गदर्शना खाली श्री लेखाजी शिंदे सहा पो निरी, श्री बालाजी डिगोले पोलिस उप नरीक्षक , पो हवा अमोल हिरवे, पोलिस हवा राहुल वंजारी,पो अम अभिजित रत्नपारखी, पो अम सुहास मोरे, पो अम थोरात,पो अम अक्षय शेडगे, पो अम गरुड,पो अम भोसले,पो अम विकास मरगळे,पो अम राहुल रासगे, पो अम शशांक खाडे कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments