आरोपी विकास घोडके हा रेकॉर्ड वरील अट्टल घरफोडी चोर असुन, त्यावर ठाणे, कल्याण, पिंपरी चिंचवड, लातुर तसेच पुणे शहर भागामध्ये ५० हुन अधिक गुन्हे दाखल आहेत.
गुन्हे शाखा, युनिट २ च्या कार्यक्षेत्रात प्रभारी अधिकारी श्री नंदकुमार बिडवई, यांचे मार्गदर्शना खाली, पोउपनिरी नितीन कांबळे, पोलीस अंमलदार अशी टिम तयार करुन, उघडकीस न आलेले घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत महत्वाच्या सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने युनिट-२ कडील पोलीस अमंलदार गजानन सोनुने व अमोल सरडे यांचे गुप्त बातमीवरुन, आरोपी १) विकास सुनिल घोडके वय २८ वर्षे, सध्या राहणार. वडगांव शेरी पुणे व मुळगाव रा. मिरी रोड, विद्यानगर, शेवगाव ता. शेवगाव, जिल्हा अहमदनगर यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ६९९/२०२३ भा.द.वि.कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा केल्याचे तपासात निषन्न झाल्याने त्यास अटक करुन, पोलीस कस्टडी दरम्यान, दाखल गुन्हयातील १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, गुन्हे करण्यासाठी वापरलेली लोखंडी कटावणी, चावीचा जुडगा (गुछा) तसेच इतर गुन्हयातील ७७.२६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा सर्व मिळुन ५,५४,७६०/- रु किमंतीचा माल हस्तगत करुन, १) सिंहगड पोलीस स्टेशन गुरनं ६०/२०२२ भा.द.वि. कलम ४५४,३८० २) फरासखाना पोलीस स्टेशन गुरनं ३१/२०२४ भा.द.वि. कलम ४५४,३८० असे एकुण ०३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री प्रविण पाटील, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा.सहा.पो.आयुक्त गुन्हे, श्री सुनिल तांबे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री. नंदकुमार बिडवई, गुन्हे शाखा, युनिट-२, पुणे शहर, पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे, पोलीस अंमलदार अमोल सरडे, गजानन सोनुने, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख, उज्वल मोकाशी, साधना ताम्हाणे, शंकर नेवसे, संजय जाधव, गणेश थोरात, निखिल जाधव, विनोद चव्हाण, यांनी केलेली आहे.
0 Comments