महीलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावुन चोरी करणा-या अट्टल चोराला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध लावण्यात सिंहगड पोलिसांना यश मिळाले आहे, आरोपीकडून एकूण ८ गुन्हे उघड केले आहे,
त्याच्याकडून एकुण ७ लाख,६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.
मागील एक ते दिड महिन्यापासुन पुणे शहरामध्ये व पिंपरी चिंचवड शहरामध्ये रस्त्याने पायी चालत जाणा-या महिलांचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावुन चोरी होण्याच्या घटना झाल्या होत्या. तसेच सिंहगड रोड पोलीस ठाणेचे हददीमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये अश्याच प्रकाराच्या तीन घटना झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, यांनी तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक सचिन निकम व त्याचे पथकास सदरचे दाखल गुन्हे उघड करण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.
वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सिंहगड रोड पोलीस ठाणे कडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार गुप्त बातमीदारामार्फत, सी.सी.टि.व्ही फुटेज तपासुन आरोपीचा शोध घेत असतांना सिंहगड रोड परिसरातील सी.सी.टि.व्ही. फुटेज चेक करुन आरोपीचे नाव निष्पन्न करुन नमुद आरोपीचा शोध घेत असतांना, दिनांक २३/०२/२०२४ रोजी सिंहगड रोड पोलीस ठाणे कडील तपास पथकातील पोलीस अंमलदार देवा चव्हाण, सागर शेडगे व राजु बेंगरे, यांना त्यांचे खास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, प्रयेजा सिटी रोड गिरीजा हॉटेलचे बाजुस असणा-या बस स्टॉप जवळ वडगाव पुणे येथे एक इसम दुचाकी गाडी घेवुन थांबला असुन सदर दुचाकीस नंबर नाही सदर इसम हा थांबलेला असून त्याने २० दिवसापूर्वी आनंदनगर पुणे येथे एका महिलेचे गळयातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावुन घेवुन गेला होता. अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी तपास पथकाचे अधिकारी सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली असता त्यांनी सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर यांना कळविली. वरिष्ठांनी सदरच्या बातमीची खात्री करुन योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिले
सहा पोलीस निरीक्षक, सचिन निकम यांनी नमुद स्टाफ सह जावुन बातमीतील ठिकाणाजवळ येवुन सापळा रचुन बातमीतील वर्णनाचा इसम आहे का ? याबाबत खात्री केली असता बातमीतील वर्णनाप्रमाणे एक इसम दुचाकी गाडीवर बसलेला दिसला त्यास आहे त्या परिस्थीतीत वरील स्टाफचे मदतीने ताब्यात घेवुन त्यास त्याच्या ताब्यातील असलेली दुचाकीची पाहणी केली असता तीस दोन्ही बाजुने नंबर नसल्याचे दिसुन आले तसेच त्यांच्याकडे अधिक तपास करता त्याने २० दिवसापुर्वी आनंदनगर भागात नमुदच्या दुचाकीवरुन येवुन रस्त्याने चालत असलेल्या एक महीलेच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारुन घेवुन गेला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ७१/२०२४ भादंवि कलम ३९२ या गुन्ह्यात दि. २३/०२/२०२४ रोजी अटक करुन त्यास मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीस पोलीस कस्टडी रिमांड दिली असता आरोपीकडे पोलीस
कस्टडी रिमांड मुदतीत अधिक तपास करता त्याने सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, अलंकार, चतुःश्रृंगी व रावेत पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दाखल गुन्ह्यातील एकुण ७,६०,०००/- रु.कि.चे. सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असुन पुढील अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -३, श्री. संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, श्री आप्पासाहेब शेवाळे, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, तानाजी तारु, राजु वेगरे, विकास बांदल, अमोल पाटील, अविनाश कोंडे, विकास पांडोळे, देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, अक्षय जाधव, शिरिष गावडे यांचे पथकाने केली.
0 Comments