दिनांक १७/०२/२०२४ रोजी कोंढवा पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे दैनंदिन कर्तव्यावर हजर असताना सहा. पो. निरीक्षक दिनेशकुमार पाटील व पोलीस हवालदार विशाल मेमाणे यांना त्यांचे खास बातमीदाराने माहिती दिली की, बोपदेव घाटाकडे जाणारे रस्त्याचे चढावर हॉटेल गारवा हिल्स हॉटेल मध्ये एका पांढ-या रंगाच्या चारचाकी गाडी मधुन तीन इसम जेवायला येणार आहेत. त्यांचे जवळ पिस्टल सारखे हत्यार आहे अशी बातमी मिळाली.
मिळालेल्या बातमी प्रमाणे कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे आदेशाने सहा. पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील व स्टाफ सदर ठिकाणी गेले असता बातमी प्रमाणे खात्री करता सदरची संशयित चारचाकी गाडी ही गारवा हॉटेलचे थोडेसे पुढे घाटाच्या बाजुस गिनी सोसायटीच्या समोरील बांबुच्या कंपाऊंड मध्ये थांबलेली असल्याचे समजल्याने त्याप्रमाणे लागलीच तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील व पोलीस स्टाफने सापळा रचुन बातमी प्रमाणे एक पांढ-या रंगाची चारचारचाकी व तिचे बाजुला तीन इसम गप्पा मारत थांबलेले दिसल्याने त्यांना वरील पोलीस स्टाफने आहे त्या परिस्थितीत पकडुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव १) प्रफुल्ल निवृत्ती निकम, वय ४१ वर्षे, रा. मु. पो. साकुर्डी, ता. कराड, जि. सातारा, २) सिमॉन रोमिओ मिरींडा, वय २५ वर्षे, रा. माझीवडा गाव, वेलनकणी बिल्डींग, तळमजला रुम नं. १, ठाणे वेस्ट व ३) समीर भगवान संकपाळ, वय २५ वर्षे, रा. मु. पो. मोप्रे, ता. कराड, जि. सातारा असे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्या तीनही इसमांची अंगझडती घेतली असता १) प्रफुल्ल निवृत्ती निकम याचे कमरेला एक लोखंडी सिल्व्हर रंगाची पिस्टल व तीन जिवंत काडतुसे व २) सिमॉन रोमिओ मिरींडा, याचेकडे एकदेशी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे लोखंडी पिस्टल व तीन जिवंत काडतुसे मिळुन आले त्यांचेकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याने त्यांचे विरोधात कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. १७३/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर आरोपींकडुन १,०३,०००/- रु.किं.चे २ देशी बनावटीचे पिस्टल व ६ जिवंत काडतुसे तसेच त्यांचे कडील असलेली १,७५,०००/- रु. किं.ची एक चारचाकी गाडी असा एकुण २,७८,०००/- रु. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची अग्नीशस्त्रे त्यांनी जवळ का बाळगले याबाबत तपास अधिकारी पोलीस अमंलदार सतिश चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत.
यातील आरोपी यांचेवर यापुर्वी पाटण, कराड, कासारवाडी, नवपाडा पोस्टे येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.
वरिल नमुद कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि.-५, पुणे श्री.आर. राजा, मा. सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री. गणेश इंगळे, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री.मानसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, लेखाजी शिंदे, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, सतिश चव्हाण, लवेश शिंदे, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुजित मदन, सुरज शुक्ला, यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments