मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी अंमली पदार्थाची तस्करी करणारे गुन्हेगार यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी कठोर पाऊल उचलणेबाबत दिलेल्या सुचनांप्रमाणे मा. अपर पोलीस आयुक्त साो गुन्हे पुणे व मा. पोलीस उप आयुक्त सोा गुन्हे पुणे शहर यांनी मार्गदर्शन करुन त्याप्रमाणे आदेश दिले होते.
त्याप्रमाणे आज दिनांक १९/०२/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट-१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, त्यांचेकडील अधिकारी व अंमलदार असे रात्रीचे वेळी हद्दीत गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार विठ्ठल सांळुखे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, २७६, सोमवार पेठ, पुणे चे समोर एक पांढरे रंगाची इर्टीगा कार नं. एम एच. १२ यु.जे. ४०८१ यामध्ये ड्रायव्हींग सिटवर एक इसम बसलेला दिसला व त्याचे शेजारच्या सिटवर पोलीस अभिलेखावरील आरोपी नामे वैभव उर्फ पिंटया भारत माने रा. पुणे हा बसलेला दिसला. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील असल्याने व त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे बातमी प्राप्त झाली.
त्याप्रमाणे युनिट-१ कडील अधिकारी व स्टाफने सदर ठिकाणी जावुन सदरची कार थांबवून अधिक चौकशी केली असता त्यांचे बोलणे अधिक संशयास्पद वाटल्याने त्यांची पंचा समक्ष झडती घेतली असता त्यांचे कब्जात रेकॉर्डवरील आरोपी नामे वैभव उर्फ पिंटया भारत माने याचे कब्जात किं रु १,००,००,०००/- चा ५०० ग्रॅम इतके वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ मिळून आल्याने रेकॉर्ड वरील आरोपी वैभव उर्फ पिंटया भारत माने व कार चालक नामे अजय आमरनाथ करोसिया वय ३५ वर्ष रा. पुणे यांना जागीच ताब्यात घेण्यात आले सदर दोन्ही आरोपींकडे कसुन चौकशी केली असता वैभव उर्फ पिंटया भारत माने यास सदरची एम डी देणारा इसमाचे नाव हैदर शेख रा. विश्रांतवाडी, पुणे याने काही वेळा पुर्वी दिल्याचे सांगीतल्याने गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार त्यांच्या एकुण ५ टिम्स विश्रांतवाडी भागात विविध ठिकाणी रवाना केल्या असता हैदर नुर शेख, वय-४० वर्षे रा. विश्रांतवाडी, पुणे हा विश्रांतवाडी परिसरात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले त्याची झडती घेतली असता त्याचे कब्जात १,००,००,०००/- किं रू क्रिस्टल पावडर स्वरुपातील ५०० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ मिळुन आला. त्याच प्रमाणे त्याचे झडतीमध्ये एक चावी मिळून आली त्याबाबत त्याचेकडे अधिक तपास करता सदरची चावी ही त्याचे विश्रांतवाडी, परिसरात असलेल्या एक पत्र्याचे गोडाऊनची आहे असे सांगितल्याने सदर ठिकाणी गोडाऊनची पहाणी केली असता त्यामध्ये १,५०,००,०००/- रू किं चे ७५० ग्रॅम वजनाचे एमडी गोडाऊनमध्ये मिळून आले त्याच प्रमाणे सदर ठिकाणी २०० ते ३०० संशयास्पद पोती मिळून आली असून त्यामध्ये मीठ असल्याचे आढळून आले आहे. परंतु सर्व पोत्यांमध्ये एम.डी. आहे किंवा नाही याबाबत गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तपासणी करीत आहेत.
ताब्यातील इसम नामे हैदर नुर शेख यांचेकडे नमुद मेफेड्रॉन अंमली पदार्थ कोणाकडुन आणला ? याबाबत विचारणा केली असता, त्याने सदरचा एमडी अंमली पदार्थ हा परदेशी नागरीक यांनी मला विक्रीकरिता दिला असल्याचे सांगितले. सदर आरोपी नामे वैभव उर्फ पिंटया भारत माने रा, पुणे व अजय आमरनाथ करोसिया रा. पुणे यांचे ताब्यात किं.रु.१,००,००,०००/- चे ५०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन अंमली पदार्थ, किं.रु.२,०००/- रोख रक्कम, एक प्लॅस्टिकचे मोकळे बॉबीचे पॅकेट, कि.रु.२००/-ची स्पोर्टस् बॅग, किं.रु.१५०००/- चे दोन मोबाईल हॅण्डसेट, एक आधार कार्ड व किं.रु.८,००,०००/-ची एक इर्टीका कार असा एकुण किं. रु.१,०८,१७,२००/- चा ऐवज मिळुन आलेला आहे.
सदरचा ऐवजामधील मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीकरिता इसम नामे हैदर नुर शेख, वय-४० वर्षे रा. पुणे याचे ताब्यात किं.रु.१,००,००,०००/- चे ५०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन अंमली पदार्थ, कि.रु.२००/-ची सॅकबॅग, किं.रु.१०,०००/- चे दोन मोबाईल हॅण्डसेट, असा एकुण किं. रु.१,००,१०,२००/- चा असा ऐवज मिळुन आलेला आहे. तसेच इसम नामे-हैदर नुर शेख याने दाखविलेल्या पुणे येथील पत्र्याचे गोडावुन मध्ये साठवणुक केलेला किं.रु.१,५०,००,०००/- चा ७५० ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ, प्लॅस्टिकचे मोकळे पॅकेट, किं.रु.१०००/- चा एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा व एक चावी असा उपरोक्त सर्व मिळुन एकुण कि.रु. ३.५८,२८,४००/- चा अंमली पदार्थ व ऐवज मिळुन आलेला आहे. परदेशी नागरीक यांचा शोधा करीता गुन्हे शाखेकडील टिम रवाना केल्या आहेत.
यातील ३ अटक आरोपीपैकी १. वैभग ऊर्फ पिटया माने २. हैदर शेख हे पुणे पोलीस अभिलेखावरील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री प्रविण पवार, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे श्री शैलेश बलकवडे मा. पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, पुणे श्री अमोल झेंडे मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे श्री सुनिल तांबे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २. पुणे श्री सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद युनिट ०१, अजय वाघमारे, राजेंद्र लांडगे, अनिता हिवरकर, विनायक गायकवाड, सपोनि बाबर, गायकवाड, पोलीस उप निरीक्षक रमेश तापकीर, शेळके, गोरे, कोळेकर, मगदुम, देव, नाईक, जाधव, शिंदे, मोकाशी, पोलीस अंमलदार विठ्ठल सांळुखे, अभिनव लडकत, दता सोनावणे, निलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशीकात दरेकर, शुभम देसाई, शंकर कुंभार, आय्याज दड्डीकर, सुजित वाडेकर, संतोष देशपांडे, निखिल जाधव यांनी केली आहे.
0 Comments