फिर्यादी महिला हया दिनांक ३१/०१/२०२४ रोजी त्यांचे राहते घर बंद करुन माहेरी गेलेल्या असताना, कोणीतरी अज्ञात इसमांनी, त्यांचे राहते घराचे खिडकीवाटे घरात प्रवेश करुन, कपाटातील सोन्याचे मंगळसुत्र, चांदीचे पायातील पट्टया व पैशांचा गल्ला चोरुन नेल्याने, फिर्यादी यांनी अज्ञात इसमाविरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.४०/२०२४, भादवि कलम ४५४,४५७,३८० अन्वये गुन्हा नोंद आहे.
दाखल गुन्हयाचा तपास सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सुरेंद्र माळाळे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक, राहुल खंडाळे व तपास पथकाचे स्टाफ करीत असताना, सहा. पोलीस उपनिरीक्षक, बापु खुटवड, पोलीस अंमलदार, संजय गायकवाड, सुशांत फरांदे यांना बातमी मिळाली की सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी नामे १) आकाश अरुण कांबळे ऊर्फ छोटया, वय-२८ वर्षे, रा. गल्ली नं.७२, तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे याने केला असुन तो सध्या त्याचे राहते घरी थांबला आहे. लागलीच तपास पथकाचे स्टाफने आरोपीतास त्याचे राहते घरातुन ताब्यात घेवुन, सहकारनगर पोलीस स्टेशन येथे आणुन तपास करता, त्याने सदर ठिकाणी रात्रीचेवेळी घरफोडी केल्याची कबुली देवुन गुन्हा केल्याचे सांगितले. नमुद आरोपीस दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्याचेकडुन दाखल गुन्हयात चोरीस गेलेला ३०,२५०/- रुपये किचा सोन्याचा दागिने व गुन्हयात वापरलेला स्क्रु-ड्रायवर असा एकुण ३०,३००/-रुपये किचा ऐवज जप्त केला आहे.
सदरचा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन, त्याचेवर विविध स्वरुपाचे एकुण २२ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, पुणे, श्री. प्रवीणकुमार पाटील, मा.पोलीस उपायुक्त, परिमंडळ- २, श्रीमती. स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे, श्रीमती. नंदीनी वग्यानी सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सुरेंद्र माळाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक राहुल खंडाळे, सहा. पो. फौज. बापु खुटवड, पोलीस अंमलदार, बजरंग पवार, संजय गायकवाड, अमोल पवार, निलेश शिवतरे, सुशांत फरांदे, पोलीस अंमलदार महेश मंडलीक नवनाथ शिंदे, सागर कुंभार, सागर सुतकर, विशाल वाघ यांनी केलेली आहे.
0 Comments