रिक्षा चालकाचे कामगिरीचे कौतुक करुन त्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी केला सत्कार...
मुंढवा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील गरीब कष्टकरी रिक्षा चालक नामे श्री. नवनीत लाल गुगळे, सध्या रा. खराडीगाव, पुणे मुळ पत्ताः नेवासा, जि. अहमदनगर यांना खराडी ते हडपसर असे भाडे घेवून जात असतांना मुंढवा ओव्हरब्रिजवर एक लेडीज बॅग मिळून आली. त्यांनी कोणताही लोभ न करता सदरची बॅग मुंढवा पोलीस ठाणे येथे जमा केली. सदर बॅगची पाहणी करता बॅगमध्ये अॅपल कंपनीचा लॅपटॉप, चार्जर, मोबाईल चार्जर असे अंदाजे १,१०,०००/- (एक लाख दहा हजार रुपये) ऐवढ्या किंमतीचा मुद्देमाल तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम कॉर्ड, गाडीचे आरसी बुक इ. महत्त्वाचे कागदपत्र मिळून आले.
रिक्षा चालक नवनीत लाल गुगळे यांनी त्यांची हालाकीची व गरीबीची परिस्थिती असतांना देखील कोणताही लोभ न बाळगता सदरची हेडीज बेंग पोलीस ठाणेस जमा करुन मानुसकीचे उत्तम उदाहरण जनतेसमोर ठेवले आहे. त्यांचे उत्कृष्ट कामाची वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मुंढवा पोलीस ठाणे यांनी दखल घेवून त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला आहे.
सदरची कामगिरी, मा. पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, पुणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उपआयुक्त, आर. राजा, परिमंडळ-५, पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त, अश्विनी राख, हडपसर विभाग, पुणे शहर यांचे सुचनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी सहा. पोलीस फौजदार, रमेश उगले, पोलीस अंमलदार निलेश पालवे, सचिन अडसुळ व इतर स्टाफ यांनी केली आहे.
0 Comments