आपापसातील वादातून शरद मोहोळचा खून झाल्याचे समोर आले आहे, त्याच्याच साथीदारांनी रचला कट, या प्रकरणात ८ जणांना अटक.


गुन्हे शाखा, पुणे शहर.
शरद मोहोळ याचा  रस्त्यावर गोळ्या झाडून खून करणाऱ्या साहिल पोळेकर याच्यासह त्याला मदत करणाऱ्या ८ जणांना काही तासातच पोलिसांनी अटक केले,शरद मोहोळ हा दगडूशेठ गणपती मंदिरात जाण्यासाठी निघाला होता शरद मोहोळ याचा लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे साथीदारासह जात असताना सुतारदरा येथे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास साहिल कोळेकर व त्याच्या साथीदारांनी शरद मोहोळवर गोळ्या झाडल्या, शरद मोहोळ हा गंभीर जखमी झाला उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला

यानंतर पोळेकर व त्याचे साथीदार हे पळून गेले होते. या घटनेची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखा अलर्ट झाली. त्यांची सर्व युनिट कामाला लागली. संशयितांचा शोध घेत असताना ते कोल्हापूरच्या दिशने जात असल्याचे आढळून आले. पुणे सातारा रोडवर किकवी ते शिरवळ दरम्यान एका स्विफ्ट गाडीतून जात असल्याचे दिसल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. आठ आरोपींकडून ३ पिस्टल, ३ मॅगझीन, ५ काडतुसे व गाडी जप्त करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त रितेशकुमार, प्रभारी सह आयुक्त आणि अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे.

Post a Comment

0 Comments