दिनांक ०३/०१/२०२४ रोजी विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलीस अंमलदार, शैलेश नाईक व सचिन जाधव यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, खराडी बायपास बसस्टॉपचे शेजारी फुटपाथवर एक इसम थाबलेला असुन, त्याचेकडे पिस्तूल सारखे हत्यार आहे.
सदरची बातमीचा आशय तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक, विजय चंदन व इतर स्टाफ यांना कळविल्यानंतर वरिष्ठांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन इसम नामे राकेश शंकर ठोकळ, वय-२३ वर्ष, रा. खजुर वस्ती दर्याचे पाठीमागे, वैदुवाडी, हडपसर, पुणे यास ताब्यात घेतले. त्याचे जवळ एकदेशी बनावटीचे पिस्टल व एकजिवंत राऊंड मिळुन आल्याने त्याचे विरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, नमुद आरोपी याचेवर हडपसर पोलीस स्टेशन येथे यापुर्वी ६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक, विजय चंदनहे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-४, पुणे शहर, श्री. शशिकांत बोराटे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे, श्री. संजय पाटील यांचे आदेशान्वये वमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. आनंदराव खोबरे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), श्रीमती. संगिता माळी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विजय चंदन, पोलीस अंमलदार, रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, सचिनजाधव, सचिन कदम, अंकुश जोगदंडे, रुपेश तोडेकर, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, शंकर वाघुले, विशाल निलख, राकेश चांदेकर यांचे पथकाने केली आहे.
0 Comments