दि.१२/१०/२०२३ रोजी फिर्यादी ह्या रा. ४०१ पार्क लॅन्ड पार्क, लेकटाऊन रोड, बिबवेवाडी, पुणे हे गेट नंबर २, पार्क लँन्डमार्क सोसायटी, लेकटाऊन रोड, बिबवेवाडी, पुणे येथुन, तसेच सह फिर्यादी रा. कात्रज, पुणे हे कात्रज तळे, ते वरखडेनगरकडे जाणाग्रा रोडवरील लेक साईट नावाच्या सोसायटी समोरील रोडवरुन पायी चालत जात असताना दुचाकी गाडीवरुन आलेल्या दोन इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांचे गळयातील सोन्याची चेन व सह फिर्यादी यांचे गळयातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारुन चोरी केली त्याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६५७/२०२३, भादंवि कलम ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नामे सागर संदीप शर्मा ऊर्फ भोवते, वय २० वर्षे, रा. एस.आर.ए, बिल्डींग, ए विंग, ७ वा मजला, लेक टाऊन, पुणे व त्याचे साथीदार अमोल रविंद्र आडम, वय २४ वर्षे, रा. शंकरनगर, जैन मंदीर, कात्रज, पुणे, प्रथमेश ऊर्फे पिल्या प्रकाश ठुमके, रा. घोटी, इगतपुरी, नाशिक यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यामध्ये सागर संदीप शर्मा ऊर्फ भोवते यास यापुर्वी या गुन्ह्यामध्ये १९/१०/२०२३ रोजी अटक करुन त्याचेकडुन दोन सोन्याच्या चैन जप्त करण्यात आल्या आहेत. दाखल गुन्ह्यातील पाहीजे आरोपी अमोल रविंद्र आडम याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अभिजीत जाधव व विक्रम सावंत यांना तो कात्रज, जैन मंदीराजवळ थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज जैन मंदीर येथे जावुन पाहता तेथे आरोपी मिळुन आल्याने त्यास अटक केली आहे. आरोपी अमोल रविंद्र आडम हा भारती विद्यापीठ, येरवडा, विश्रांतवाडी या पोलीस स्टेशनच्या गुन्हयांमध्ये फरार आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहा. पो. निरी. अमोल रसाळ, पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, विक्रम सावंत, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड, राहुल तांबे, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments