कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर .कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रुटं मार्च करण्यात आले, रूट मार्चमध्ये एसीपी वानवडी विभाग व कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी हे उपस्थित होते.



रुट मार्च दरम्यान असणाऱ्या सीआर मोबाईल मधुन व मार्शल वरील पी.ए. सिस्टीम वरून नागरीकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये तसेच पोलीस मदतीसाठी ११२ नंबरवर कॉल करावा अशा सुचना देण्यात आल्या.


दिनांक २०/१/२०२४ रोजी कोंढवा पोलीस स्टेशन हददीतील आगामी दिनांक २२/१/२०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळा व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन दिवशी कायदा व सुव्यवस्था चे दृष्टीकोनातुन रूट मार्च आयोजन करण्यात आले होते.
सदर रूट मार्च चे आधी सर्व अधिकारी व अंमलदार यांना सदर आगामी बंदोबस्त अनुषंगाने सुचना देण्यात आल्या. त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी व अंमलदार यांच्यासह कोंढवा पोलीस स्टेशन येथुन ६ वाजता सुरू करण्यात आला अशोका म्युज चौक - डवीकडे हेमंत करकरे चौक - पुढे सरळ अरुणा डेअरी चौक- बैतुल उलम मदरसा - पुढे सरळ सर्वे नं. ४२

 उजवीकडे न्यु ग्रेस स्कुल फैजान ए मदीना मस्जीद - पुढे अबु बकर मस्जीद साई बाबानगर गल्ली नं. १० पुढे नवाजिश चौक - डावीकडे वळुन बिलाल मस्जीद मक्का मस्जीद भाग्योदय नगर जमियत सोहलियात मदरसा ईस्लामिया बेकरी पुढे सरळ मोहंम्मदीया मस्जीद - जामा मस्जीद भाग्योदय नगर सरळ मेन रोड भैरवनाथ मंदिर सरळ माजी आमदार श्री. महादेव बाबर ऑफिस - पुढे सरळ ज्योती चौक उजवीकडे वळुन मेफयर एलेगंझा सोसायटी उजवीकडे वळुन कौसरबाग रोड जमजम हॉटेल चौक - जाफरान हॉटेल चौक वेलकम हॉल चौक उजवीकडे शितल पेट्रोल पंप डावीकडे अशोका म्युज
सोसायटी - कोंढवा पोलीस स्टेशन समारोप १९/५० वा. पर्यंत रुट मार्च घेण्यात आला १) रुट मार्चचे वेळी मिश्र वस्ती / मंदीर, मस्जीद व संवेदनशिल पॉईंट मधुन रूट मार्च घेण्यात आला.२) रूट मार्चचे वेळी कोंढवा पोलीस स्टेशन कडील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार, मार्शल हे वेळेवर शस्त्र, लाठी, हेल्मेट सह हजर होते. ३) रुट मार्च दरम्यान असणाऱ्या सीआर मोबाईल मधुन व मार्शल वरील पी.ए. सिस्टीम वरून नागरीकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये तसेच पोलीस मदतीसाठी ११२ नंबरवर कॉल करावा अशा सुचना देण्यात आल्या.४) रूट मार्च झाले नंतर अधिकारी व अंमलदार यांना माननीय सहा.पो.आयुक्त साो. वानवडी विभाग श्री. शाहुराजे साळवे यांनी ब्रिफिंग यांनी योग्य त्या सुचना दिल्या व रूट मार्च बंदोबस्त क्लोज करण्यात आला.

सदर रूट मार्च हा मा.पोलीस आयुक्त सो. पुणे शहर, श्री. रितेश कुमार साहेब, मा.अपर पोलीस आयुक्त साो, श्री. रंजनकुमार शर्मा, श्री. आर. राजा साहेब पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, श्री शाहुराव साळवे सहा पोलीस आयुक्त सो, वानवडी विभाग,यांचे मार्गदर्शनाखाली,वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे,
पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. संदीप भोसले तसेच सी.आर. मोबाईल, तपास पथक अधिकारी असे अधिकारी व पोलीस स्टेशनकडील अंमलदार यांचे उपस्थितीत पार पडला.

Post a Comment

0 Comments