आगामी लोकसभा, विधान सभा निवडणूक २०२४ ही पुणे शहरात निर्विघ्न व शांततेत पार पाडणे कामी व पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसविण्याकरिता मा. रितेशकुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी कडक पावले उचलली असून त्यासाठी पुणे शहरातील सराईत गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश पुणे शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेले आहेत.
त्याप्रमाणे खडक पोलीस स्टेशन पुणे चा गुन्हे अभिलेखावरील सराईत व अटट्ल गुन्हेगार नामे- नजीर सलीम शेख, वय-२९ वर्षे, रा. हनुमान मंदिरा जवळ काशेवाडी भवानी पेठ पुणे याचे विरुध्द खडक पोलीस स्टेशन येथे सन २०१९ पासून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारामारी करणे, घातक हत्यारे जवळ बाळगणे, जबरी चोरी करणे, धमकी देणे, सामान्य नागरिकाना विनाकारण मारहाण करणे यासारखे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. स्थानबदघ इसमाचे वाढते गुन्हेगारी कारवाईना आळा घालणे साठी सन २०२३ साली त्यास ०२ वर्षा करिता तडीपार ही करण्यात आलेले होते. स्थानबध्द इसमास तडीपार करूनही त्याने गुन्हे केलेले आहेत.
नमुद सराईत गुंड व स्थानबध्द इसम नामे नजीर सलीम शेख, वय-२९ वर्षे, रा. हनुमान मंदिरा जवळ काशेवाडी भवानी पेठ पुणे याचेविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुनही त्याचे वागणुकीत काहीएक फरक पडलेला नव्हता. तो अत्यंत क्रुर, खुनशी व भांडखोर असुन तो लोकांमध्ये काहीना काही कुरापती काढुन मारहाण करुन गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहे. तेथील व्यापा-यांना व बिल्डर ना खंडणी मागणे, सर्वसामान्य, शांतताप्रिय नागरीकांना विनाकारण त्रास देवुन आपला गुन्हेगारी हेतु साध्य करीत आहे. तसेच बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगून लोकामध्ये दहशत निर्माण केली होती. त्याचे दहशतीमुळे व भितीपोटी त्याचेविरुध्द तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नव्हते. त्याचे अशा कृत्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे मनात भिती निर्माण होवुन त्यांचे जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. म्हणुन श्री. सुनिल माने, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी त्यास स्थानबध्द करणे बाबत चा प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांना सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन करून मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी दि ०९/११/२०२३ रोजी अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे स्थानबध्द करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे खडक पोलीस स्टेशन कडून स्थानबध्द इसमास अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती. येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
चालू वर्षामध्ये खडक पोलीस स्टेशन कडून तिस-या सराईत गुन्हेगारावर एम. पी. डी. ए कायदया अंतर्गत मोठी कारवाई केल्याने परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचा पोलीसांवरील विश्वास वाढला आहे.
या अनुषंगाने पोलीसांकडुन समाजकंटक व अटट्ल गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले असुन त्यांचेविरुध्द कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीसांनी दिले आहेत.
सदर कारवाई श्री रितेशकुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री संदिप कर्णिक, सह पोलीस आयुक्त श्री प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग, पुणे शहर श्री संदिप गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परि-१ पुणे श्री. अशोक धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शना खाली श्री. सुनिल माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस स्टेशन, पुणे, श्री. संपतराव राऊत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), खडक पोलीस स्टेशन, पुणे.. सहा पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस उप निरीक्षक अतुल बनकर, पोलीस नाईक, नितिन जाधव, पोलीस अंमलदार महेश पवार, स्वप्नील बांदल यांनी सदर कारवाई मध्ये भाग घेवुन प्रस्ताव तयार केलेला आहे.
0 Comments