मुंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर.मुंढवा पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली,गावठी पिस्तल व जिवंत काढतुस बाळगणाऱ्या आरोपीस अटक.




याबाबत सविस्तर माहिती दिनांक ७/११/२०२२ रोजी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री विष्णु ताम्हाणे यांचे आदेशाने मुंढवा तपास पथक अधिकारी व अंमलदार हे मुंढवा पोलीस ठाणे हददीत येणा-या दिवाळी सणाचे अनुशंगाने गुन्हे प्रतिबंध गस्त करीत असताना मुंढवा तपास पथकातील अंमलदार पोहवा / दिनेश राने व पोशी / स्वप्नील रासकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की इसम नामे आदीत्य महेश चौधरी वय २१ वर्षे रा महात्मा फुले वसाहत १३ ताडीवाला रोड पुणे. हा मुंढवा पोलीस ठाणे हददीत फिरत असुन त्याचेजवळ गावठी पिस्टल बाळगुन आहे. वरील मिळालेल्या बातमीची खात्री करुन कार्यवाही करण्याबाबतचे आदेश, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विष्णु ताम्हाणे यांनी दिले, मुंढवा तपास पथक अधिकारी सपोनी श्री संदीप जोरे व स्टाफ जाहागिर चौक ते आंबेडकर चौक, घोरपडी,मुंढवा, पुणे या रस्त्यावर जावुन मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे आदीत्य महेश चौधरी वय २१ वर्षे रा महात्मा फुले वसाहत १३ ताडीवाला रोड पुणे यास शिताफिने ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.सदर आरोपी विरुध्द मुंढवा पोलीस ठाणे गुर नं ३६३ / २०२३ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असुन गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.

सदरची कामगीरी मा. श्री रीतेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री संदिप कर्णीक ,
सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा साो, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, मा. श्री विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. श्रीमती अश्विनी राख मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे पुणे, श्रीमती संगिता रोकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलीस ठाणे पुणे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक संदिप जोरे पोहवा ७३२ दिनेश राणे, पोहवा ४१७२ संतोष काळे पोशी ४४४१ स्वप्नील रासकर, पोहवा दिनेश भांदुर्गे, पोहवा राहुल मोरे सचिन पाटील यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments