दिनांक ३०/१०/२०२३ रोजी रात्री खडक पोलीस स्टेशन हद्दीतील घोरपडे पेठ परिसरात फिर्यादी है त्यांचे राहते घरी झोपले असताना घराच्या दरवाज्यावर चार-पाच वेळा टकटक वाजवल्यामुळे फिर्यादी यांनी घराचा दरवाजा उघडला असता दरवाज्या बाहेर एका इसमाने फिर्यादीस,तेरा भाई किधर है उसको बुला असे म्हणाल्यामुळे फिर्यादी यांनी त्यांचा चुलत भाऊ अनिल यांना “बाहर कोई आपको बुला रहा है" असे सांगितले.
त्यावेळी समोरच्या इसमाने फिर्यादी यांचा चुलत भाऊ अनिल काहीतरी विचारले असता, अनिल यांनी त्यास मान हालवुन नकार दिला. त्याचवेळी अचानक सदर इसमाने त्याचे जवळील बंदुक अनिल यांचे कपाळावर लावून गोळी झाडून त्याचा खुन केला आणि फिर्यादीचे राहते इमारती बाहेर श्रीमंत सुवर्ण भारत मित्र मंडळ जवळ थांबलेल्या त्याचे साथीदारासह दुचाकीवर बसुन घाई गडबडीने निघुन गेला. म्हणुन त्या अनोळखी दोन इसमांविरुध्द फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खडक पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. ३६९/२०२३.भा.द.वि कलम ३०२,३४, आर्म अॅक्ट कलम ३ (२५) मपोअधि कलम ३७ ( १ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरिक्षक (गुन्हे), श्री. संपतराव राऊत हे करीत आहेत.
सदर गुन्हयातील इतर तीन इसमांना गुन्हे शाखेकडुन ताब्यात घेतले होते. परंतु गुन्हयातील मुख्य आरोपी हा पाहिजे आरोपी होता.
गुन्हयातील मुख्य आरोपी नवनाथ ऊर्फ नव्या सुरेश लोधा हा पाहिजे आरोपी असल्याने त्यास पकडणेकामी खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनिल माने व पोलीस निरिक्षक (गुन्हे). श्री. संपतराव राऊत यांनी तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. राकेश जाधव व अंमलदार यांना योग्य त्या सुचना देवुन, आरोपी नवनाथ ऊर्फ नव्या सुरेश लोधा याचा शोध चालू असताना पोलीस अंमलदार, हर्षल दुडम व आशिष चव्हाण यांना नमुद गुन्हयातील बंदुकीतून गोळी झाडलेला मुख्य आरोपी नवनाथ लोधा ऊर्फ नव्या हा आहे व तो खेड-शिवापुर येथे थांबुन आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली.
सदर बातमीचे अनुशंगाने वरिष्ठांनी त्यास तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेश दिल्याने सहा. पोलीस निरिक्षक राकेश जाधव यांनी पथकासह खाजगी वाहनाने बातमीच्या ठिकाणी खेड-शिवापुर याठिकाणी जावुन मुख्य आरोपी नवनाथ ऊर्फ नव्या सुरेश लोधा, वय-३७ वर्षे, रा. घोरपडे पेठ, पुणे यास ताब्यात घेवुन, त्याचेकडे दाखल गुन्हयाबाबत अधिक तपास केला असता, त्याने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपी नवनाथ ऊर्फ नव्या लोधा यास गुन्हया मध्ये दिनांक ३०/१०/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचे तपासा दरम्यान त्याचेकडून गुन्हयात वापरलेले १ गावठी पिस्टल जप्त करण्यात आले असुन, गुन्हयातील त्याचा साथीदार आरोपी गणेश उल्हासराव शिंदे याचेकडुन तपासा दरम्यान दोन गावठी पिस्टल व दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आले असुन अधिक तपास चालु आहे...
मुख्य आरोपी नवनाथ उर्फ नव्या सुरेश लोधा याचेविरुद्ध यापुर्वी खडक, मुंढवा व दत्तवाडी पोलीस ठाणेस दुखापत, घातक शस्त्र जवळ बाळगणे, गैर-कायद्याची मंडळी जमवुन खुनाचा प्रयत्न, अग्निशस्त्राचा वापर करुन खुनाचा प्रयत्न व जाळपोळ असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. प्रविण पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-१, पुणे श्री. संदिपसिंह गील व मा.सहा.पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे, श्री. अशोक धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. संपत राऊत, सहा पोलीस निरीक्षक राकेश जाधव पोलीस उप- निरीक्षक, अजीज बेग, पोलीस अंमलदार, हर्षल दुडम, संदिप तळेकर, सागर घाडगे, लखन ढावरे, आशीष चव्हाण, मंगेश गायकवाड, सागर कुडले, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले, रफिक नदाफ, महिला पोलीस अंमलदार, राणी जाधव यांचे पथकाने केली आहे.
0 Comments