वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर.पोलिसांकडून विद्यार्थ्यांच्या चोरीला गेलेले लॅपटॉप पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लॅपटॉप केले परत,चोरीचे 12 गुन्हे उघडकीस,



यापुर्वी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीमध्ये कॉलेज परिसरतील बिल्डींग / हॉस्टेल मध्ये प्रवेश करुन विद्यार्थ्यांनी बुट अथवा दरवाजा जवळ ठेवलेली चावी वापरुन विद्यार्थ्यांचे रुम मध्ये चार्जिंगला लावलेले किंवा रुममध्ये ठेवलेले लॅपटॉप चोरीचे प्रकार घडत असल्याने दि.३१/१०/२०२३ रोजी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा रजि नंबर ४५२ / २०२३ भादवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हेगाराकडून एकुन १३ लॅपटॉप, ७ लॅपटॉप चार्जर, १ सोनी कंपनी चाकॅमेरा, २ दुचाकी जप्त करुन पुणे शहर तसेच महाड शहर पोलीस स्टेशन जिल्हा रायगड व मानगाव पोलीस स्टेशन जिल्हा रायगड येथील एकुन ११ गुन्हे उघडकीस आणुन एकुन ६,४४,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल अर्जुन तुकाराम झाडे, वय २२ वर्षे, रा. लेन क्र.३,हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर, पुणे याचेकडुन जप्त करण्यात आला होता.

तसेच आरोपी नामे प्रतिक मांडेकर व ऋषिकेश शिर्के, दोघे रा. मावळे आळी, कर्वेनगर, पुणे यांचा गोपनीय बातीमीदारा मार्फतीने शोध घेवून, त्यांचेकडुन वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४४८/२०२३ भादवि कलम ३८० प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीचे २ लॅपटॉपचा शोध घेवून, सदरचे लॅपटॉप जप्त करण्यात आलेले आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३ श्री. सुहेल शर्मा, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग,पुणे,श्री.भिमराव टेळे वारजे माळवाडी पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल जैतापुरकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. अजय कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक, नरेंद्र मुंढे, रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार, प्रदिप शेलार, हनुमंत मासाळ,अमोल राऊत,गोविंद फड, विक्रम खिलारी, विजय भुरुक, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, अजय कामठे, अमोल सुतकर, राहुल हंडाळ, नंदकुमार चव्हाण यांनी केली आहे.

दि.६/११/२०२३ रोजी वरील जप्त मुद्देमाल नमुद गुन्हयातील फिर्यादी यांना मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर, श्री रितेश कुमार यांचे हस्ते परत करण्यात आलेला आहे. सदर कामगिरी बाबत मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार यांनी वरील पोलिस अधिकारी व पोलिस अमंलदार यांचे अभिनंदन केले आहे. सदर वेळी मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३ श्री. सुहेल शर्मा, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे, श्री. भिमराव टेळे हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments