पुणे शहर पोलीस दलातर्फे दि. ०४/१०/२०२३ रोजी ते दि.०६/१०/२०२३ या कालावधीत शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, पुणे या ठिकाणी हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, हॉलीबॉल, हॅण्डबॉल व कबड्डी इत्यादी स्वरूपाचे सांघिक खेळ, त्याचप्रमाणे वैयक्तिक स्वरूपाचे रनिंग, कुस्ती, ज्युडो, वेट लिफ्टिींग इत्यादी खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
३९ वी पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा २०२३ - २०२४ करीता पुणे शहर व पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन, शाखा तसेच मुख्यालय येथे नेमणूकीस असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार स्पर्धक खेळाडू तसेच संघाची निवड करण्यात आली होती.
स्पर्धेत उत्कृष्ट अॅथलेटीक्स म्हणून पुरुष गटामध्ये विकास इंगळे तसेच महिला गटामध्ये यामीनी ठाकरे या स्पर्धकाची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे १०० मिटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये पुरुषामध्ये विकास इंगळे पुणे शहर व महिलामध्ये यामीनी ठाकरे पिंपरी चिंचवड यांनी प्रथम क्रमांक मिळविला. पुरुषामध्ये शुभम दांडगे यांनी तसेच महिलांमध्ये रुपाली बंदीवाडेकर यांनी व्दितीय क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे सांधीक स्पर्धामध्ये सर्वसाधारण विजेतेपद मुख्यालय शिवाजीनगर या संघाने पटकाविले.
सदर स्पर्धेमध्ये प्रथम, व्दीतीय क्रमांक पटकाविलेले खेळाडू तसेच विजयी संघाचे प्रतिनिधी यांचा सत्कार मा. प्रो. डॉ. सुरेश गोसावी, उप-कुलगुरू, सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांचे शुभहस्ते करणेत येवून विजेत्या स्पर्धकांना तसेच संघाना पारितोषीक प्रदान करण्यात आले.
आजच्या क्रिडा स्पर्धेच्या सांगता समारंभापूर्वी रस्सी खेचच्या झालेल्या स्पर्धांमध्ये अधिकारी वर्ग यांना विजेतेपदाचे बक्षिस देण्यात आले.
सदर परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेचा सांगता समारंभ सुमारास मुख्यालय, शिवाजीनगर येथे मा. प्रो. डॉ. सुरेश गोसावी, उप-कुलगुरू, सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांचे हस्ते पार पडला. या कार्यक्रमास माजी पोलीस महासंचालक श्री. प्रविण दिक्षीत व सौ. दिक्षीत मॅडम, मा. सह. पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. रामनाथ पोकळे श्री. रंजनकुमार शर्मा, श्री. अरविंद चावरिया तसेच पुणे पोलीस आयुक्त व पिपरी चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्रातील इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्याचे आगमन आणि मानवंदना झाल्यानंतर स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडुचे संचलन झाले. स्पर्धेचे प्रमुख पाहुणे मा. प्रो. डॉ. सुरेश गोसावी, उप-कुलगुरू, सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी खेळाडुंचे मनोधैर्य वाढेल अशा पध्दतीने आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी तर आभार प्रदर्शन मा. पोलीस सहआयुक्त, पिंपरी चिंचवड श्री. संजय शिंदे यांनी केले.
अशा प्रकारच्या आयोजित स्पर्धांमधूनच उत्कृष्ठ खेळाडू तसेच प्रतिभावंत संघामधूनच महाराष्ट्रातील वेगवेगळे आयुक्तालय, परिक्षेत्रस्तरावर आयोजित स्पर्धेकरीता खेळाडूंची निवड करणेत येते.
या कार्यक्रमास सेवानिवृत्त अधिकारी, पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच क्रिडा शौकीन व इतर मान्यवर नागरीक हजर होते.
0 Comments