पुणे-कोंढवा साळुंखे विहार सोसायटी च्या परिसरामध्ये झोपलेल्या ९ वर्षांच्या 'पिंकी' नावाच्या श्वानाला,महिन्द्रा थार, मोटारीखाली चिरडण्यात आले, या घटनेत श्वानाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाले, ही घटना १९ सप्टेंबर रोजी, रात्री ८ दरम्यान घडली होती. याप्रकरणी सी सी टीव्ही फुटेजची पडताळणी करून, महिन्द्रा थार 'चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढवा पोलिसांनी एमएच १२, युएन ७६११ या मोटारीवरील चालकाविरुद्ध भादवि कलम ४२९, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९, मोटार वाहन कायदा कलम १८४, प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (एल) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शशी नारायण भुषण (वय ४२, राहणार साळुंखे विहार सोसायटी, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.
कोंढवा पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहेत.
0 Comments