खडकी बाजार, येथे फिर्यादी नामे, भुषण रामचंद्र पांगुडवाले, वय ४० वर्षे, धंदा व्यवसाय, केबर व्यवसाय, रा. २१४१, गवळीवाडा, खडकी बाजार, पुणे हे त्यांचे दुकानासमोर झाडु मारुन साफ करीत असताना त्याचा कचरा यातील आरोपी नामे, शाहरुख याचे अंगावर उडाला त्याचा राग मनात धरुन चिडुन शाहरुख बागवान व मोहसिन बागवान व त्याचा साथिदार आदिल यांनी येवुन शिवीगाळ करुन शाहरुख यांने कोयत्या सारखे धारदार हत्याराने केलेला वार फिर्यादी यांनी त्यांचे डावे हातावर झेलला असता त्यांचे डाव्या हातास गंभीर दुखापत करुन फिर्यादी यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मोहसीन याने फिर्यादी याचे डाव्या डोळ्याचे वरील बाजुस मारुन जखमी करुन तसेच आदिल यांने लाकडी दाडंक्याने फिर्यादी याचे मानेवर, पाठीवर मारुन फिर्यादी यांना जखणी करुन हातातील हत्यारे हवेत फिरत सदर ठिकाणी दहशत करुन निघुन गेले होते. सदरबाबत खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ३१३ / २०२३ भा.द.वि. कलम ३०७, ३४ आर्म अॅक्ट कलम ४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ४ (२५) सह १३५, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी नामे, शाहरुख उर्फ सुलतान कासीम बागवान, वय २६ वर्षे, रा. खडकी बाजार, खडकी पुणे, २) मोहसीन कासीम बागवान, वय ३३ वर्षे, रा.खडकी बाजार, पुणे ३) आदिल शमशुद्दीन शेख, वय १७ वर्षे, रा. खडकी बाजार, पुणे (विधीसंघर्षीत बालक) हे आरोपी असुन ते रेकॉर्डवीरल गुन्हेगार आहेत. त्यांचेविरुध्द यापुर्वी, दुखापत करणे, प्राणघातल हल्ले करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपी शाहरुख उर्फ सुलतान कासीम बागवान, वय २६ वर्षे, रा. खडकी बाजार, पुणे याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असुन त्यानी बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिसांचाराचा वापर करुन किंवा हिसाचार करण्याची धमकी देवुन किंवा धाकदपटशा दाखवुन किंवा जुलुम जबरदस्ती करुन किंवा अन्य अवैद्य मार्गाने आपले बेकायदेशीर कृत्य चालु ठेवुन संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असुन त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील जुमानत नसलेने तसेच त्याचे वर्तनात सुधारणा होत नसलेने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (२), ३ (४) चा अंतर्भाव करणेकामी खडकी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे यांनी मा. शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त, परि-४, पुणे शहर यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रदेशिक विभाग,पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा यांना सादर केलेला होता. सदर प्रकरणाची छाननी करुन वरिल टोळीविरुध्द खडकी पोलीस स्टेशन येथे गु.नं. ३१३ / २०२३ भा.द.वि. कलम ३०७, ३४, आर्म अॅक्ट कलम ४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ४ (२५) सह १३५, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ०७ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३(४) चा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, मा. आरती बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र सहाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. अर्जुन बेंदगुडे, पोलीस उप निरीक्षक, श्री. संतोष भांडवलकर, पोलीस उप निरीक्षक सर्वेलन्स अंमलदार राजकिरण पवार, रमेश जाधव यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर भर देवुन शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने कठोर पावले उचलण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत.
0 Comments