पर्वती पोलिस स्टेशन, पुणे शहर.सराईत गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्टल आरोपीस अटक.यापूर्वीचे गुन्हे खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर अग्नीशस्त्र / धारदार शस्त्रे बाळगणे, जबरी चोरी, इत्यादी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल.



वरिष्ठांचे सुचनांनुसार पुणे शहरातील अवैद्य हत्यारे, अग्नीशस्त्रे बाळगणा-यांवर सक्त कारवाई करण्याच्या आदेशांनुसार पर्वती पोलीस ठाणेचे तपास पथक पर्वती पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडणारे गुन्हयांना प्रतिबंध करणेसाठी तसेच शांतता व सुव्यवस्था राखणेकामी पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार, कुंदन शिंदे व पुरुषोत्तम गुन्ला यांना बातमी मिळाली की, पर्वती पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील आरोपी साहिल पटेल याचेकडे देशी बनावटीचे पिस्टल असुन तो शाहु वसाहत, लक्ष्मीनगर येथे शंकर गणपती मंदीर सार्वजनिक शैचालयाचे बोळीत येथे संशयास्पदरित्या थांबलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली.

सदर बातमीचे अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. जयराम पायगुडे व पोलीस निरिक्षक (गुन्हे), श्री. विजय खोमणे यांना कळवुन त्यांचे आदेशाने पोलीस उपनिरिक्षक, चंद्रकांत कामठे यांनी स्टाफसह सदर ठिकाणी जावुन सोबतचे स्टाफचे मदतीने सापळा रचुन साहिल हनिफ पटेल, वय २१ वर्षे, रा. आंबेडकर वसाहत, लक्ष्मीनगर, पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व ०१ जिवंत काडतुस ३५,७००/- रू किमंतीचे व जप्त करण्यात आले असुन, त्याचेविरुध्द पर्वती पो.स्टे. येथे गु.र.नं. २७८/२०२३, भारताचा हत्याराचा कायदा कलम ३ (२५), मुंबई पोलीस अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपी हा पर्वती व बिबवेवाडी पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर अग्नीशस्त्र / धारदार शस्त्रे बाळगणे, जबरी चोरी, चोरी, दंगा इत्यादी गंभीर स्वरुपाचे गुन्हे यापुर्वी दाखल असुन त्याने सदरचे पिस्टल कशासाठी व कोणाकडुन आणले होते. तसेच त्याचा यापुर्वी कोठे वापर केला अगर कसे व त्याचे अन्य साथीदार कोण आहेत याचा पर्वती पोलीस वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सखोल चौकशी करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उपआयुक्त, परि ३, श्री. सुहैल शर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड विभाग, श्री. अप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयराम पायगुडे, पोलीस निरिक्षक (गुन्हे), श्री. विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, चंद्रकांत कामठे, पोलीस अंमलदार, कुंदन शिंदे, अमित सुर्वे, दयानंद तेलंगे, प्रकाश मरगजे, नवनाथ भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, किशोर वळे, अनिस तांबोळी, अमोल दबडे, प्रशांत शिंदे, अमित चिव्हे प्रमोद भोसले, सद्दाम शेख व ज्ञानेश्वर चिंदे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments