गुन्हे शाखा युनिट ०३, पुणे शहर.मौजमजा करण्यासाठी लोकांची चार चाकी वाहने घेऊन जाऊन फसवणुक करणाऱ्यास जेरबंद.त्याचेकडून एकुण सुमारे ४५ लाख रूपये किंची ७ वाहने जप्त.


यातील फिर्यादी यांची इर्टिका कार रू. ५,५०,०००/- ही गाडी इसम नामे सयाजी पाटील याने शिरवळ येथील कंपनीत महिना ५०,०००/- रूपये भाडे तत्त्वावर लावून देतो असे सांगून, फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून कार घेवून जावून, फिर्यादीस कोणताही परतावा न देता, त्यास वारंवार विनंती करूनही त्याने तक्रारदार यांची गाडी परत न करता फसवणुक केली म्हणून तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि. न. ४११ / २०२३ भादंविक ४०६, ४२० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

नमुद गुन्हयाचा तपास राहुल पवार पोलीस उप-निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-०३, पुणे शहर हे करीत असताना आरोपी नामे सयाजी ज्ञानदेव पाटील, वय-३५, रा. तातोबा कॉम्प्लेक्स, मानाजीनगर, न-हे, पुणे मुळगाव-अमनापुर, ता. पलुस, जि. सांगली यास पोलीस अंमलदार, ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळालेल्या बातमीवरून त्यास घेवुन दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. त्याचेकडे तपास करता त्याने खालील इसमांची तक्रारदार यांचेप्रमाणे फसवुणक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.



अशा एकुण ७ चार चाकी वाहने ४३,५०,०००/- रू किच्या नमुद आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत. आरोपीकडे केले तपासात त्याने सदरचा गुन्हा हा स्वतः मौजमजा करण्याकरीता केला असल्याचे तपासात सांगीतले आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे - ०१ श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. श्रीहरी बहिरट, पोलीस उप-निरीक्षक, अजितकुमार पाटील, पोलीस उप-निरीक्षक, राहुल पवार, पोलीस अंमलदार, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, किरण पवार, सुजीत पवार, संजिव कळंबे, सुरेंद्र साबळे, ज्ञानेश्वर चित्ते, सतीश काळे, प्रकाश कटटे, साईनाथ पाटील, प्रताप पडवाळ, साईनाथ कारके, गणेश शिंदे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments