कल्याणीनगर पुणे येथील एका इमारतीच्या ६ व्या मजल्यावर ऑफीसचे काम सुरु असताना कंपनीच्या प्रतिनिधी यांना इसम नामे विकी नारायण औरंगे रा. येरवडा पुणे हा माथाडी अनुषंगाने कोणतेही काम न करता १,२०,०००/- रुपयांची बेकायदेशीर मागणी करुन त्याचे टेम्पो मधील साहित्य खाली करण्यास अडथळा निर्माण करुन तक्रारदार यांचे ऑफीसचे काम बंद पाडुन जीवे ठार मारण्याची धमकी देवून माथाडीच्या नावाखाली कोणतीही वर्क ऑर्डर दिलेली नसताना तसेच माथाडीचे कोणतेही काम न करता काम सुरळीत सुरु ठेवण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे १ लाख २० हजार रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती ८० हजार रुपयांची बेकायदेशीर पैशांची मागणी केल्या प्रकरणी तक्रारदार यांनी खंडणी विरोधी पथक यांच्याकडे तक्रार दिलेली होती. - २ गुन्हे शाखा पुणे शहर
सदर तक्रारीची तात्काळ दखल घेवुन कारवाई करण्याच्या सुचना मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे यांनी दिल्या होत्या. त्या नुसार खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखा पुणे चे पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव व टिमने सापळा कारवाई करुन विकी नारायण औरंगे यास तडजोडी अंती ८० हजार रुपयांची खंडणीची रक्कम तक्रारदार यांच्याकडुन स्विकारताना रंगेहात पकडुन त्याचेवर येरवडा पोलीस स्टेशन येथे गु. रजि. नं. ६०१ / २०२३ भा.द.वि. कलम ३८६, ३८७,५०४ अन्वये गुन्हा दाखल केलेला असुन गुन्हयातील आरोपी नामे विकी नारायण औरंगे रा. येरवडा पुणे हा सध्या पोलीस कस्टडीत आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे - २ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २, गुन्हे " शाखा, पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, विजय गुरव, सैदोबा भोजराव, शंकर संपते, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, चेतन आपटे, प्रदिप गाडे यांनी केलेली आहे.
0 Comments