युनिट-०६, गुन्हे शाखा, पुणे शहर.पुण्यासह महाराष्ट्रातील जिल्हयात दरोडा व घरफोडया करणारा रेकॉर्डवरील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार जेरबंद, आरोपीवर अनेख गुन्हे दाखल आहेत.


पुणे शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहनचोरी या गुन्हयांना आळा बसावा याकरीता तीव्र मोहिम राबवून कारवाई करणेबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी आदेशित केले होते. लोणी काळभोर पोलीस ठाणे गु.र.नं. ५२५/२०२३.भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८०, ४११३४ या गुन्हयाचा तपास युनिट ६ मार्फत चालू असताना पोलीस अंमलदार, नितिन मुंडे यांना त्यांचे रेकॉर्डवरिल गुन्हेगार सोनू ऊर्फ संजिव टाक. रा. हडपसर, पुणे हा मांजरी बुद्रुक स्मशान भुमीजवळ, मांजरी, पुणे येथे येणार आहे. अशी बातमीदारा मार्फत खात्रीशिर माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट ६ चे प्रभारी अधिकारी श्री रजनीश निर्मल यांचे आदेशानुसार युनिट कडील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन सोनु ऊर्फ संजिव कपुरसिंग टाक, वय-२८ वर्षे, रा. स.नं.१४.शाळा नंबर १०० मागे तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर, पुणे यास दिनांक २६/०८/२०२३ रोजी ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता प्राथमिक तपासात सदरचा गुन्हा त्याचे साथीदारांसह केल्याची कबुली दिल्याने त्यास दि. २६/०८/२०२३ रोजी अटक करुन, त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली आहे. रिमांड मुदतीत त्याचेकडे तपास करता, त्याने सदरचा गुन्हा साथीदार पंकजसिंग दुधानी. रा. अंबरनाथ याचेसह केला असल्याचे सांगितले. सदर आरोपीने सोन्या-चांदीचे दागिनेची तसेच रोख रक्कमेची घरफोडी चोरी केल्याची ठिकाणे दाखवून सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण २,६३,५००/- रु किचा मुद्देमाल काढुन दिल्याने तो जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये खालील पो.स्टे कडील एकुण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत..

(१) विमानतळ पोलीस स्टेशन गु. रं. नं- ३४७/२०२३ भा.द.वि. कलम ३८०, ४५७, ४५४
 २) विमानतळ पोलीस स्टेशन गु.र.नं-२६१ / २०२३ भा.द.वि. कलम ३८०, ४५७, ४५४

३) येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं-४४१ / २०२३ भा.द.वि. कलम ३८०, ४५७.४५४

४) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं-१४५६ / २०२२ भा. द. वि. कलम ३८०.४५४ 
५) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं-४७१ / २०२३ भा.द.वि. कलम. ३८०, ४५७,४५४

६) लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं-१२५/२०२२ भा. द. वि. कलम. ३८०, ४५७,४५४

७) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं-५७७/२०२२ भा.द.वि. कलम ३८०, ४५७, ४५४ ८) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं-५११ / २०२३ भा.द.वि. कलम.३८०, ४५७

९) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं-५२५/२०२३ भा.द.वि. कलम. ३८०, ४५७,४५४,४११

आरोपीकडे तपास करता तो महाराष्ट्रातील खालील पो.स्टे चे गुन्हयातील पाहिजे आरोपी असल्याचे उघडकीस आले आहे.



१) कराड पो.स्टे जिल्हा सातारा गु.र.नं. ७३१ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९५

२) रोहा पोलीस स्टेशन जिल्हा रायगड गु.र.नं. २२४ / २०२२ भा.दं.वि. कलम ४५७, ३८०

३) सावर्डे पोलीस स्टेशन जिल्हा सांगली गु.र.नं. १२१ / २०२३ भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० ४) मानवत पोलीस स्टेशन जिल्हा परभणी गु.र.नं. ३५४ / २०२२ भा.दं.वि. कलम ३७९

५) शेवगाव पोलीस स्टेशन जिल्हा परभणी गु.र.नं. ९०३ / २०२२ भा.दं.वि. कलम ३७९

६) माणगाव पोलीस स्टेशन जिल्हा रायगड गु.र.नं. ३५९/२०२२ भा. दं. वि. कलम ४५४, ४५७, ३८० ७) पाली पोलीस स्टेशन जिल्हा रायगड गु.र.नं. १७० / २०२२ भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८०

८) महाड पोलीस स्टेशन जिल्हा रायगड गु.र.नं. १७३ / २०२२ भा.दं.वि. कलम ३७९

९) रायसोनी पोलीस स्टेशन जिल्हा ठाणे गु.र.नं. १४३ / २०२३ भा.दं.वि. कलम ३७९ १०) सावर्डे पोलीस स्टेशन जिल्हा सांगली गु.र.नं. ४३ / २०२३ भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८०

११) अंबरनाथ पोलीस स्टेशन जि.ठाणे गु.र.नं. ७५०/२०२३ भा.दं.वि. कलम ३९९ ४०२, आर्म अॅक्ट कलम

४ (२५), महा. पो. कायदा कलम ३७ (१) सह १३५

नमूद आरोपी सोनू ऊर्फ संजिव कपूरसिंग टाक यास मा. न्यायालयाने दिनांक ०१/०९/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडीची रिमांड दिली आहे. नमूद गुन्हयातील सोन्याची अंगठी त्याने त्याची आई हिस दिल्याने तीचाही गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. नमूद गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहर, श्री. रजनीश निर्मल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, भैरवनाथ शेळके हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक, भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, पोलीस अंमलदार, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे प्रतिक लाहीगुडे, प्रमोद मोहिते, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन घाडगे, आशफाक मुलाणी, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments