पर्वती पोलीस स्टेशन.पुणे शहर.पर्वती पोलीसांच्या सतर्कतेमुळे सोन साखळी चोरांचे जळगाव कनेक्शन उघड,पुण्यामध्ये चेन स्नॅचिंग करणा-या दोन टोळयांचे ६ सराईत आरोपी जेरबंद.सदर आरोपींनी गुन्हा कबुल केल्याने त्यांचेकडुन सुमारे ७ लाख/- रुपये किचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना गुन्हयांत अटक करण्यात आली आहे.



दिनांक २४/०८/२०२३ रोजी ई-लर्निंग चौक पर्वती दर्शन पुणे येथून रिक्षातुन जाणा-या एका महिलेच्या गळयातील मंगळसूत्र चैन स्नॅचिंग करुन दुचाकीवरील दोघे चोरटे पसार झाले होते. त्याबाबत पर्वती पो स्टे येथे गु.र.नं. २४६/२०२३ भादवि कलम ३९२.३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता. त्याचप्रमाणे विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ३९२.३४ प्रमाणे एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल होता. गुन्हा रजि. नं. १८४/२०२३

दाखल दोन्ही गुन्हयांची अति वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी दखल घेवुन आरोपींचा शोध तात्काळ घेणेकामी पर्वती पोलीसांना आदेशीत केले होते. त्यानुसार मा. सहा. पोलीस आयुक्त, श्री. अप्पासाहेब शेवाळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री जयराम पायगुडे, पर्वती पोलीस ठाणे यांना तपास पथकातील अंमलदारांची चार पथके तयार करुन तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीकोनातुन कारवाई करण्यास सांगितले..

त्याअनुशंगाने पर्वती पोलीस ठाणेचे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, सुनिल जगदाळे, चंद्रकांत कामठे व तपास पथक अमंलदार हे घटनास्थळापासुन विविधप्रकारे आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस नाईक, प्रकाश मरगजे व किशोर वळे यांनी आरोपीतांची अधिक माहिती घेतली असता, सदरचे आरोपी हे गुन्हा करुन संगम ब्रिज, पुणे येथुन त्यांचे मुळगावी जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने, वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सापळा रचुन १ ) आकाश ज्ञानेश्वर सुर्यवंशी, वय-२५ वर्षे, रा. गुरुकृपा अपार्टमेंट, टेल्को कॉलनी, दत्तनगर, कात्रज, पुणे, मुळगाव-जळगाव २) लोकेश मुकुंदा महाजन, वय-२४ वर्षे, रा.सदर मुळगाव-जळगाव यांना ताब्यात घेवुन, त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी जळगाव येथुन येऊन भारती विद्यापीठ, बिबवेवाडी, सहकारनगर, विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत त्यांचे साथीदार मित्र यांचे मदतीने त्यांनी चेन स्नॅचिंग केल्याचे कबुल केल्याने, पोलीसांनी तत्पर तपासकामी जळगाव येथे जावुन धाडसाने त्यांचे मुळ गावातुन आरोपी नामे १) प्रसाद उर्फ परेश संजय महाजन, वय-२५ वर्षे, रा. ज्ञानदेव नगर जळगाव २) संदीप अरविंद पाटील, वय २८ वर्षे, रा. कांचन नगर स्वामी समर्थ केंद्राचे मागे, जळगाव ३) दिपक रमेश शिरसाठ, वय २५ वर्षे, रा. वरखेडी, ता.पाचोरा. जि. जळगाव यांना सुध्दा ताब्यात घेतले असता, त्यांनी सुध्दा जळगाव येथुन पुण्यात येऊन चेन स्नॅचिंग केल्याचे सांगितले आहे.

यातील आरोपीतांनी जळगाव येथून येऊन दत्तनगर कात्रज भागात राहुन पुणे शहरात ०५ ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याचे निष्पन्न झाले असुन, पर्वती, भारती विद्यापीठ, सहाकरनगर, बिबवेवाडी व विश्रामबाग या पोलीस स्टेशन मधील ०५ गुन्हे आतापर्यंत उघडकीस आले आहेत. त्यांचेवर यापुर्वी देखील जळगाव, अकोला, पुणे, अमरावती शहरात चैन स्नॅचिंगचे सुमारे ३० चे वर गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपींनी गुन्हा कबुल केल्याने त्यांचेकडुन सुमारे ७,००,०००/- रुपये किचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना गुन्हयांत अटक करण्यात आली आहे. आरोपी हे अकोला, जळगाव, अमरावती पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन, या भागातुन त्यांनी पुण्यात येवुन चैन स्नॅचिंग सुरु केल्या होत्या. मात्र पर्वती पोलीसांच्या सतर्कतेमुळे सोन साखळी चोरांचे जळगाव कनेक्शन उघड झाले असुन, त्यांचे आणखीण कोण साथीदार आहेत काय आणि अटक आरोपींनी आणखी यापुर्वी पुणे शहरात चैन स्नॅचिंग केली अगर कसे याचा सखोल तपास चालू आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, श्री. प्रविणकुमार पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परि-०३, श्री. सुहेल शर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त, सिहगड विभाग, श्री. अप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. जयराम पायगुडे व पोलीस निरिक्षक, (गुन्हे), श्री. विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक, सुनिल जगदाळे, चंद्रकांत कामठे, पोलीस अंमलदार, कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, किशोर वळे, अमित सुर्वे, अनिस तांबोळी, प्रशांत शिंदे, अमित चिव्हे, सद्दाम शेख, दयानंद तेलंगे-पाटील, नवनाथ भोसले, अमोल दबडे, प्रमोद भोसले, ज्ञानेश्वर शिंदे व पुरुषोत्तम गुन्ला यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments