भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, हर्षल शिंदे, सचिन गाडे, यांना त्यांचे बातमीदारामार्फेतीने बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील वाहन चोर कुणाल सुरेश बधे, वय २९ वर्षे, धंदा वायरमन, रा. मु.पो रांजणे, ता. वेल्हा, जि. पुणे हा अमृत खान, लिपाणे वस्ती येथे चोरीची दुचाकी गाडी घेवुन थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे अमृत खान लिपाणे वस्ती गेले असता तेथे नमुद आरोपी दुचाकी गाडी, हीच्यासह मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन तपास करता त्याने सदरची गाडी चोरी केल्याची कबुली दिली असता त्या गाडीबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५६५ / २०२३ भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील चोरीस गेले असल्याची निष्पन्न झाले असुन त्याचे ताब्यातील दुचाकी गाडी ही जप्त करुन त्यास नमुद गुनहयात अटक केली आहे.
आरोपी कुणाल सुरेश बधे, वय २९ वर्षे, धंदा वायरमन, रा. मु.पो रांजणे, ता. वेल्हा, जि.पुणे याचेकडे अटके दरम्यान तपास केला असता त्याचेकडुन एकुण ५ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असुन आरोपीताकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
१. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन
२. कोंढवा पोलीस स्टेशन
३. कोंढवा पोलीस स्टेशन
वरील प्रमाणे आरोपीताकडुन एकुण ३,००,०००/- रुपयांची ५ दुचाकी वाहने जप्त करुन ३ दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीताकडुन जप्त केले आणखीन दोन गाड्यांबाबत माहीती घेण्याचे कामकाज चालु आहे.
सदरची कामगिरी मा. रितेशकुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. संदीप कर्णिक, सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा. नारायण शिरगावकर साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे, सचिन सरपाले, चेतन गोरे, शैलेश साठे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी,राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments