मुंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विष्णु ताम्हाणे.५० सीसीटीव्ही चा तपास करुन अखेर पोलिसांना यश,बी.टी. कवडे रोडवरील किराणा मालाच्या दुकानातील कॅश चोरणारे दोघांना अटक.


दिनांक २२/०७/२०२३ रोजी मुंढवा पोलीस ठाणे हददीत वठारे मळा या ठिकाणी असलेल्या फिर्यादी यांचे दुकानातील रोख रक्कम ही फिर्यादी हे दुकानाबाहेर गेले असताना त्यांचे काउंटर मधुन अज्ञात आरोपींनी चोरुन नेलेबाबत मुंढवा पोलीस ठाणे येथे गुर नं २४४ / २०२३ भा. द. वी ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्हयाचा तपासाचे पुढील आदेश मुंढवा पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री विष्णु ताम्हाणे यांनी तपास पथक प्रमुख श्री संदीप जोरे व टिम यांनी दिल्याने सदर टीम चोरी झालेल्या दुकानातील सीसीटीव्ही व दुकानासमोरील रोडवरील सीसीटीव्ही च्या माध्यमातुन अज्ञात आरोपीचा तपास करीत होते. जवळजवळ ५० सीसीटीव्ही चा तपास करुन अखेर पोलीसांना सदर अज्ञात आरोपी पर्यंत पोहचण्यात यश आले असुन आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांचेकडुन गुन्हयात चोरलेली रक्कम जमा करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीची नावे १) चंद्रकांत राजु जाधव वय २४ वर्षे २) राहुल इश्वर सितापुरे वय २९ वर्षे दोघे रा सर्वोदय कॉलनी मुंढवा असे आहेत. वरील अटक आरोपींकडे अधिक तपास चालू आहे.

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे श्री. रंजनकुमार शर्मा मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर श्रीमती अश्विनी राख यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विष्णु ताम्हाणे गुंढवा पोलीस ठाणे पुणे, प्रदिप काकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे). मुंढवा पोलीस ठाणे पुणे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक संदिप जोरे, दिनेश राणे दिनेश भांदुर्गे, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे सचिन पाटील व स्वप्नील रासकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments