कोंडव्यातील बोपदेव घाट येथील कॉलेजच्या परिसरात बंदुकीच्या गोळीसारखी बुलेट मिळून आल्याने पोलिसांनी आणि ए.टी.एस.ने घटनास्थळी धाव घेतली.



दिनांक २६/८/२३ रोजी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील के. जे. कॉलेज, बोपदेव घाट, कोंढवा पुणे येथे बॉईज व गर्ल्स हॉस्टेल जवळ बेड चे डिलिव्हरी करिता इसम नामे निपाणी यांचे समोर एक बंदुकीच्या गोळी सारखी बुलेट सदृश वस्तू मिळाली,सदर माहिती मिळताच

कोंढवा पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी आणि ए.टी.एस च्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

सदर बुलेट ही खरी आहे किंवा कसे हे निश्चित होत नसल्याने तसेच सदर बुलेट पुंगळी ही एअर गन मधील आहे का ? याबाबत अधिक तपास करून योग्य ती कार्यवाही करण्याची तजवीज ठेवली आहे. सदर बाबत कॉलेज चे मॅनेजमेंट अधिकारी श्री. सोमनाथ ढगे यांचे कडे चौकशी केली. सदर ठिकाणी कोणताही भांडणाचा प्रकार घडलेला नाही असे समक्ष सांगितले . अद्याप संशयित काही नाही.तरी सदर हॉस्टेलवर व कॉलेज परिसरात अधिक माहिती घेत, सदर परिसरात शांतता आहे,  सदर घटनेत संशय रित्या  आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असे कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments