झुमकार अॅपवरुन गाडी बुक करुन अपहार व फसवणुक केलेल्या ६० लाख रुपये किंमतीच्या गाडया राजस्थान जवळच्या पाकिस्तान सिमे जवळुन केल्या जप्त.

चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर.

चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ३३८ / २०२३ भादविकलम ४२० ४०६, ३४ अन्वये गुन्हा नोंद असलेले दाखल गुन्हयातील गाडीचे अपहार करून, झुमकार कंपनीचा विश्वासघात करुन २० लाख रुपये किं.ची फसवणुक केले बाबत तक्रार दिल्याने ती तक्रार नोंद करण्यात आली होती.

सदर गुन्ह्याबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक अरविंद कुमरे, व स्टाफ असे तपास करीत असताना गोपनिय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने आरोपी नामे सुफीयानजे चौहान, वय १९, रा. फतेगंज, बी सी मिस्त्री, कंम्पाउंड, सदर बाजार, वडोदरा, गुजरात, ३९०००२ हा इंदौर, मध्यप्रदेश येथे असल्याचे समजताच इंदौर मध्यप्रदेश येथे जावुन त्याचा शोध घेवुन तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे कडे तपास केला असता, त्याने गेल्या तीन ते चार महिन्यामध्ये झुमकार ॲप वरती विविध व्यक्तीचे ओळखपत्रे अपलोड करुन वाहने बुक करुन त्याचे अगर त्याचे इतर मित्राचे बँक अकाउंटव्दारे पेमेंट करुन त्याने व त्याचा साथीदार माहमंद सामा, रा. गुजरात असे मिळुन मुबंई पुणे येथुन गाडया घेवुन जावुन अवैध व्यवसायात वापर करण्याकामी राजस्थान येथे अनोळखी व्यक्तीना विक्री केल्याचे सांगितल्याने जि. बाडमेर राजस्थान येथे जावुन दाखल गुन्हयातील २० लाख रुपये किं.ची गाडी ताब्यात घेण्यात आलेली आहे.

तसेच दाखल गुन्हयातील गाडीचा शोध घेत असताना आरोपी याने यापुर्वी झुमकारची फसवणुक करुन घेवुन गेलल्या व राजस्थान येथे विक्री केलेल्या इतर दोन गाडया पैकी १५ लाख रुपये किं.ची एक गाडी व २५ लाख रुपये किं.ची एक गाडी अशा दोन्ही गाडयाचा शोध घेवुन त्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.

तसेच दाखल गुन्हयातील आरोपी याने अशाच प्रकारचे अपराध केल्याने त्याचे विरुध्द मुंबई शहर पोलीस येथे नुकतेच गुन्हे नोंद करण्यात आले आहेत व त्यास मुंबई पोलीसांनी अटक केली आहे.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री. रंजनकुमार शर्मा पुणे शहर, मा. पोलीस उप आयुक्त परि. ४ श्री शशिकात बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री. संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनिषा पाटील, पोलीस उप-निरीक्षक अरविंद कुमरे, पोलीस उप-निरीक्षक दिलीप पालवे, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, सुहास निगडे, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर, विकास कदम यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments