भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर.
भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
मोक्यामध्ये सहा महिन्यापासुन फरार असलेला आरोपीस शिताफीने केले जेरबंद.
दि. ०५/०८/२०२३ रोजी कॉम्बींग ऑपरेशन दरम्यान भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील आरोपी चेक करीत असताना, पोलीस अंमलदार, मितेश चोरमोले, अभिजीत चौधरी, अषीश गायकवाड, अवधुत जमदाडे यांना त्यांचे बातमीदाराने बातमी दिली की भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नं.३१७/२०२३.भा.द.वि. कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४८, १४९ ४२७ आर्म अॅक्ट ४ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३ (१) (ii) ३ (२), ३(४) या गुन्हयामध्ये मागील सहा महिन्यापासुन पाहीजे असलेला आरोपी सनी सोमनाथ सिह, वय-२३, रा. फलॅटनं. २, रोहित अपार्टमेंन्ट, आंबेगाव- बुद्रुक पुणे हा सुंदर गार्डन, कात्रज, पुणे येथील हायवे रोडवर थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सुंदरगार्डन, कात्रज, पुणे येथील रोडवर जावुन सापळा रचुन आरोपी सनी सिंह यास ताब्यात घेवुन पुढील कारवाईकामी गुन्हयाचे तपासी अधिकारी मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर श्री. नारायण शिरगावकर यांचे ताब्यात देण्यात आले असुन त्यांनी सदर आरोपीतास नमुद गुन्हयामध्ये अटक केली आहे.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री प्रविणकुमार पाटील. मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ - २, पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहा पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस उप-निरीक्षक सागर भोसले, पोलीस अंमलदार, मितेश चोरमोले अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, शैलेश साठे, निलेश ढमढेरे, चेतन गोरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, विक्रम सावंत, राहुल तांबे यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments