विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर.प्रसाद उर्फ चिक्या संपत गायकवाड (टोळी प्रमुख) व त्याचे ०२ साथीदार यांचे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई,मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी, मकोका अंतर्गत केलेली ही ५२ वी कारवाई आहे.


दिनांक ०९/०८/२०२३ रोजी विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ४२४ / २०२३ भा. दं.वि. कलम ३९२, ३५२,४२७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील तीन आरोपी यांनी फिर्यादी यांना कोणाच्या सांगण्यावरुन तु येथे हातगाडी लावतो. तुझी हातगाडी लगेच बंद करुन घे नाहीतर तुला दाखवतो मी कोण आहे. तु येथे कसा धंदा करतो तेच बघतो असे म्हणुन शिवीगाळ करुन फिर्यादी यांना गाडीवर बस व आमच्या सोबत चल. तुला आम्ही कोण आहे ते दाखवितो अशी धमकी देवून, जबरदस्तीने फिर्यादी यांचे गल्ल्यातील रोख ३०००/- रुपये घेवुन गेले होते त्याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याचे तपासा दरम्यान आरोपी नामे १) प्रसाद उर्फ चिक्या संपत गायकवाड वय २५ वर्षे रा. वडगाव शेरी, पुणे (टोळी प्रमुख) २) अरबाज अयुब पटेल, वय २४ वर्षे, रा. येरवडा, पुणे ३) बबलु संतोष चव्हाण वय २२ वर्षे रा.विमाननगर, पुणे (टोळी सदस्य) यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने अ.क्र. १ व २ यांना गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आले आहे.

वरील आरोपीचे पूर्व रेकॉर्डची पाहणी करता, आरोपी नामे प्रसाद उर्फ चिक्या संपत गायकवाड ( टोळी प्रमुख) याचे विरुध्द एकुण ०८ गुन्हे दाखल असून आरोपी अरबाज अयुब पटेल याचेविरुध्द ०६ गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी बबलु संतोष चव्हाण याचेविरुध्द ०४ गुन्हे दाखल आहेत. वरील तीनही आरोपी यांनी एकत्रितरित्या गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झालेले आहे. यातील टोळीप्रमुख आरोपी याने त्याचे साथीदारासह स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोडा, सार्वजनिक मालमत्तचे नुकसान, बेकायदेशीर जमाव जमविणे, घातक शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे करुन सर्वसामान्य जनते मध्ये दहशत निर्माण केली आहे. यातील नमुद आरोपी यांनी विरुद वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा गुन्हे केलेले आहेत.

दाखल गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१)(ii).३(२). ३(४) प्रमाणे चा अंतर्भाव करणेसाठी मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. विलास सोडे यांनी मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ ०४ पुणे शहर श्री शशिकांत बोराटे यांच मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पणे शहर श्री. रंजन कुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रकरणाची छाननी करून विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ४२४ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९२.३५२, ४२७,५०४, ५०६, ३४ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१)(ii) ३ (२), ३(४) प्रमाणे चा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा यांनी मंजुरी दिलेली आहे.

दाखल गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर श्री. संजय पाटील, हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ ०४ पुणे शहर श्री शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर श्री. संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. विलास सोडे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती संगीता माळी, सहा पोलीस निरीक्षक श्री.. मिलींद पाठक, सर्व्हेलन्स पथकातील पोलीस उप निरीक्षक श्री.एस.एस. कोकुरे व पोलीस हवालदार उमेश डे म.पो. अमलदार भोर शिंदे यांनी केली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन, शरिरा विरुध्द व मालमते विरुध्द गुन्हे करणारे व नागरीकां मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मकोका अंतर्गत केलेली ही ५२ वी कारवाई आहे.

Post a Comment

0 Comments