श्री,संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर. कोंढवा पोलिसांच्या सतर्कतेमुळे ऑनलाइन फसवणुकीचे पैसे फिर्यादी यांना परत मिळाले.


कोंढवा पोलीस स्टेशन येथे ऑनलाईन सायबर तक्रार अर्ज क्रमांक – 112/2023 मधील अर्जदार श्री मेहुल पिल्ल्ई यांचे MOBIKWIK चे E- Wallet चा आयडी व पासवर्ड अज्ञात इसमांनी घेवून त्याव्दारे त्यांचे अकाऊंट टेकओवर करून 60,000/- रूपये अज्ञात इसमांनी काढले होते. कोंढवा पोलीस स्टेशनला मिळालेला ऑनलाईन सायबर तक्रार अर्ज सदर बाबत,

सतर्कता दाखवून, सदर बाबत संबधीत नोडल कंपनीबरोबर लागलीच फोनव्दारे तसेच ईमेल व्दारे संपर्क करून अर्जदार यांना सदर रक्कमेमधील एकुण 58500/- रूपये परत मिळवून देण्यात आले आहेत. सदरची कार्यवाही, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे कोंढवा पोलीस स्टेशन,  पोनि संदिप भोसले गुन्हे, कोंढवा पोस्टे, पोनि संजय मोगले गुन्हे कोंढवा पोस्टे यांचे मार्गदर्शनाखाली पोशि. शेलार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments