सिंहगड रोड पोलीस स्टेशन हाद्दीत रेकॉर्डवरील आरोपी संशयीत इसम तसेच वाहन चोरीच्या गुन्ह्याना गुन्हयांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिहगडरोड पो स्टे पुणे व पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर याचे आदेशाने सहा. पोलीस निरीक्षक, सचिन निकम, सहा. पो. उप-निरीक्षक, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार, सागर शेडगे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, देवा चव्हाण, अमोल पाटील, स्वप्नील मगर, दक्ष पाटील व विकास पांडोळे याचे सह पोलीस स्टेशन हद्दीत दि. १४/०८/२०२३ रोजी ते दि. १५/०८/२०२३ रोजीचे दरम्यान कोम्बींग ऑपरेशन राबवित असताना, कॅनोल रोड तुकाईनगर येथे एक दुचाकी गाडी संशयीतरित्या वडगावचे दिशेने येत असताना दिसल्याने सदरची गाडी ही वरील स्टॉफचे मदतीने थांबवुन चालकास त्याचे लायसन्स व गाडीचे कागदपत्रा बाबत चौकशी केली असता, तो उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याने त्याचेवर संशय आल्याने त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अभिषेक दशरथ वाघमारे, वय २२ वर्षे, रा. दांडेकर पुल पुणे, असल्याचे सांगितले.
त्याचे ताब्यातील दुचाकी गाडीबाबत त्याचेकडे जागीच सखोल तपास केला असता, त्याने उडवा- उडवीचे उत्तरे देत असल्याने सदर गाडीबाबत पोलीस स्टेशन अभिलेख पाहता, सदरची गाडी सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं.३८५/२०२३ भादवि कलम ३७९ या गुन्ह्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, सदर आरोपीस दाखल गुन्ह्यात दि. १४/०८/२०२३ रोजी अटक करुन त्याचेकडे अधिक तपास करता त्याने सिंहगडरोड पोलीस स्टेशन परीसरातुन आणखी दोन दुचाकी गाड्या चोरी केले असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याच्याकडुन सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील तीन दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या असुन, तीन गुन्ह्याची उखल करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक, सचिन निकम हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ - ३, श्री. सुहेल शर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे, श्री. अप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अभय महाजन, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), श्री. जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, गणेश मोकाशी, सहा.पो.फौज. आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार, संजय शिंदे, विकास पांडोळे, विकास बांदल, अमोल पाटील, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, देवा चव्हाण, सागर शेडगे, दक्ष पाटील, स्वप्नील मगर, अविनाश कोंडे यांचे पथकाने केली.
0 Comments