"केशवनगर भागामध्ये दहशद निर्माण करणारे आरोपी जेलबंद.नागरीकांमध्ये समाधान... मुंढवा पोलीस ठाणेची कामगिरी"
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
मुंढवा पोलीस ठाणे हद्दीतील केशवनगर भागात मेडिकल स्टोअर मध्ये जाऊन वस्तू खरेदी करून पैसे न देता लोखंडी हत्याराचा धाक दाखवून मारहाण करून दहशत निर्माण केले वरून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर २२६ / २०२३ भा. दं.वि. कलम ३२४ आर्म अॅक्ट ४,२५ प्रमाणे अनोळखी इसमा विरुद्ध दिनांक १६/०७/२०२३ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दिनांक १७/०७/२०२३ पोलीस तपास दरम्यान तांत्रीक मदत घेवून तपास केला. त्यावरुन १) सोपान रामेश्वर सावंत, वय २२ वर्ष, रा. सदाशिवनगर, गांधीला वस्ती, फरसंगी, पणे ३) अभिषेक संजय जरांडे, वय २० वर्ष, रा. जय गंगानगर, केशवनगर मुंढवा पुणे यास अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयातील आरोपी यांचेकडे तपास केला असता नमूद आरोपी अ.क्र. ०१ याने गुन्ह्यात वापरलेले लोखंडी हत्यार बोली-बोळीच्या रस्त्याने जाऊन टाकलेले ठिकाण तो दाखवत असल्याने त्यास पोलीस संरक्षणामध्ये तो सांगत असल्याप्रमाणे चालत घेऊन जाऊन सदरचे हत्यार जप्त करण्यात आले आहे.
अशा प्रकारच्या मुंढवा पोलीस ठाणे कडुन गुन्हेगारांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे मुंढवा-केशवनगर भागातील व्यापारी व व्यवसायीक नागरीक, महिला यांचेत सुरक्षीततेची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे पोलीसांनी केलेल्या जलद कायदेशिर कारवाई बदल नागरीकांनी समाधान व्यक्त करुन पोलीसांचे कामगिरीचे कौतूक केले आहे.
सदरची कामगिरी, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर व मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर यांचे आदेशानुसार मा. अपर पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर व मा. पोलीस उप- आयुक्त, विक्रांत देशमुख, परिमंडळ-५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त, अश्विनी राख, हडपसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांचे सुचानाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक, समीर करपे, संदीप जोरे, पोलीस उपनिरीक्षक, धनंजय गाडे, पोलीस अंमलदार दिनेश राणे, वैभव मोरे, सचिन बोराटे, दत्ता जाधव, स्वप्निल रासकर, सचिन पाटील यांचे करवी यशस्वी कारवाई केलेली आहे.
नागरीक, महिला यांना कोणी धाक-धपटशहा, दहशद करीत असेल तर त्यांनी त्याबाबत तक्रार दिल्यास त्वरीत कारवाई करण्यात येईल असे मुंढवा पोलीस ठाणे कडून नागरिकांना अहवान करण्यात आले आहे.
0 Comments