आज दिनांक 18/07/2023 रोजी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत वानवडी विभागातील कोंढवा,मार्केटयार्ड ,वानवडी,बिबेवाडी पोलीस स्टेशन कडील आगामी सणानिमित्त मोहरम सण साजरा करणारे व वानवडी विभागातील शांतता कमिटी सदस्य यांची आज रोजी, सायंकाळी 18.00 वा. मीटिंग आयोजित करण्यात आली. सदर मीटिंग चे आयोजक कोंढवा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे साहेब यांनी केले असून कार्यक्रमास श्री रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, श्री राजेंद्र देशमुख पोलीस उपायुक्त परिमंडळ 05, श्री शाहूराव साळवे सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, श्री संदीप भोसले पोलीस निरीक्षक गुन्हे कोंढवा पोलीस स्टेशन, श्रीमती ढमढेरे मॅडम वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबेवाडी पोलीस स्टेशन, श्री सुरेश सिंग गौड वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केट यार्ड पोलीस स्टेशन, श्री भाऊसाहेब पठारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन तसेच माजी नगरसेवक गफूर पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,माजी नगरसेविका हसीना इनामदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, समीर अन्सार शेख अल्पसंख्यांक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, श्री छबील पटेल , श्री इसाक पानसरे व वानवडी विभागातील 3 पोलीस स्टेशनचे पोलीस स्टाफ व गोपनीय कर्मचारी असा दीडशे ते दोनशे लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता.
सदर मीटिंगमध्ये खालील प्रमाणे सूचना व मार्गदर्शन करण्यात आले आहे.
1) ताबूत व पंजा मिरवणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संयमाने व सामंजस्याने वागावे.
2) मिरवणुकी दरम्यान वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही यासाठी स्वयंसेवक नेमावे .
3 ) ज्या ठिकाणी पंजे / ताबूत यांची स्थापना करण्यात येते विशेषता सर्व पंजे हे सोने किंवा चांदीचे असतात यासाठी विशेष करून ज्या ठिकाणी पंजे बसवले जातात त्या ठिकाणी स्वयंसेवक नेमावे.
4) ज्या ठिकाणी पंजे / ताबूत बसवले जातात त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत योग्य सूचना देण्यात आलेल्या आहेत.
5. ताबूत या ठिकाणी स्वतःचे स्वयंसेवक नेमण्यात यावेत. सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा कोणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेणार नाही याची दक्षता घ्यावी.
सदरची मीटिंग 19.30 वा. शांततेत पार पडली.
(संतोष सोनवणे)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
0 Comments