अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर परदेशी नागरिकांकडुन १,२०,००० /- रुपये किंमतीचे ०६ ग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ, रोख रुपये व इतर ऐवज जप्त .
दिनांक १३/०७/२०२३ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील अधिकारी व स्टाफ विश्रांतवाडी पोलीस ठाणे, पुणे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार संदिप शिर्के व प्रविण उत्तेकर, यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पुणे विश्रांतवाडी येथील बॉम्बे सॅप्रस ए डी एम बटालियन समोर सार्वजनिक रोडवरील एक परदेशी नागरिक हा त्याचे ओळखीचे लोकांना कोकेन हा अंमली पदार्थ विक्री करीत आहे.
मिळालेले बातमीचे अनुषंगाने कायदेशिर कारवाई करणे बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी अधिनस्त स्टाफ, अधिकारी यांना सुचना दिल्या. त्यानुसार इकडील विभागाकडील अधिकारी व स्टाफने सदर ठिकाणी सापळा रचुन इसम नामे पॅट्रीक अॅमोस, (Patrick Amos ), ऊर्फ बोरा वय - ३९ वर्षे, रा. सर्व्हे नंबर १२/१/१ फ्लॅट नंबर ४०२, मोरया पार्क, गल्ली नंबर २ सुर्य अर्पाटमेंट पिंपळे गुरव पुणे ६१ मुळ रा. साऊथ अफ्रिका देश यांस ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता, त्याचे ताब्यात एकुण १,७१,०००/- रु चा ऐवज त्यामध्ये ०६ ग्रॅम कोकेन कि रु १,२०,०००/- चा तीन मोबाईल फोन कि रु १०,०००/- चे कि रु २५,०००/- दुचाकी मोटार सायकल व रोख रुपये १५,०००/- एक इलेक्टॉनिक वजन काटा १,०००/- रु. किं.चा पासपोर्ट, ओळखपत्र, बँकपासबुक, असा ऐवज व कोकेन हा अंमली पदार्थ असा ऐवज हा अंमली पदार्थासह अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला म्हणुन त्यांचे विरुध्द विश्रांतवाडी पो स्टे गु र नं १९४ /२०२३, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत पोलीस अंमलदार संदिप शिर्के यांनी विश्रांतवाडी पो स्टे येथे फिर्याद दिली आहे
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे मा. सहा पो आयुक्त, गुन्हे १ श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ " गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, पोलीस अंमलदार संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, राहुल जोशी, नितेश जाधव, रेहाना शेख, विशाल शिंदे, योगेश मोहिते यांनी केली आहे.
0 Comments