वानवडी पोलीस स्टेशन. पुणे शहर
वानवडी येथील महिलांची सोन साखळी खेचणारे सराईत आरोपींना 24 तासात अटक.
दिनांक १०/०७/२०२३ रोजी फिर्यादी हे त्यांची सहकारी हिचे सोबत मॉर्निंग वॉक करून त्यांच्या राहते घरी जात असताना, मथुरेवाला गार्डनच्या समोर वानवडी पुणे या ठिकाणी आले असता, त्यांचे पाठीमागुन एका अनोळखी इसमाने येवून फिर्यादी यांचे गळयातील सोन्याची चेन जबरीने खेचून त्याचे इतर साथीदारांसह दुचाकीवरून पळुन गेले होते. सदरबाबत वानवडी पोलीस ठाणे गु.र.नं.३२९/ २०२३ भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला होता.
सदर दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास पथक प्रभारी पोउपनि संतोष सोनवणे यांनी तपास करत असताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ - ५, पुणे शहर यांनी गुन्हा उघडकीस आणणेकरीता दिलेल्या सुचनेप्रमाणे तपास पथकातील पोउपनि संतोष सोनवणे, पोलीस अंमलदार, विष्णु सुतार, विठठल चोरमले, राहुल माने, संदिप साळवे, राहुल माने यांनी छुप्या पध्दतीने सापळा रचून खालील आरोपीत यांना मोठ्या शिताफिने ताब्यात घेलते आहे. अटक केलेल्या आरोपीत यांचे नावे -
१) उदयान दिपक ओव्हाळ, वय २४ वर्षे, रा. केसनंद फाटा, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे २) आकाश सुरेश वाघीरे वय २० वर्षे, रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनचे पाठीमागे, शांतीनगर, शिवाजी नगर, पुणे
नमूद आरोपीत यांचेकडुन वानवडी पोलीस ठाणे येथील वर नमूद गुन्हयात अटक करून सोन्याची चेन व गुन्हयातील दुचाकी वाहन असे एकुण १,००,०००/- किमतीचे मुददेमाल हस्तगत करून २४ तासांच्या आत आरोपीत यांना अटक करून गुन्हे उघडकीस आणला आहे..
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त, परि. ५. पुणे शहर, श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर श्री. शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक, भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक, (गुन्हे), श्री. पाटणकर व तपास पथकातील पोलीस उप-निरिक्षक, संतोष सोनवणे, पोलीस अंमलदार, अमजद पठाण, हरीदास कदम, अतुल गायवकवाड, अमोल गायकवाड, संतोष नाईक, निलकंठ राठोड, यतिन भोसले व महिला पोलीस अंमलदार, सोनम भगत यांनी केली आहे.
0 Comments