सिंहगड रोड हद्दीमधील रहिवासी इमारतीच्या आर्थिंगची वायर चोरी

सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर

सिंहगड रोड हद्दीमधील रहिवासी इमारतीच्या आर्थिंगची वायर चोरी करुन नागरीकांच्या जीवितास धोका निर्माण करणा-या दोन आरोपीतांना केले जेरबंद

दि. १२/०७/२०२३ रोजी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं. ३२३ /२०२३. भादविकलम ३८०, ३३६, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार नमुद गुन्हयातील दोन अनोळखी इसमांचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार देवा चव्हाण व स्वप्निल मगर यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दुर्वाकुर सुष्टी, जेएसपीएम कॉलेज जवळ न हे पुणे याठिकाणी आर्थिगची वायर चोरी करणारे इसम हे पांढ-या रंगाचे वेस्पा गाडीवर नवले ब्रीज खाली थांबलेले आहेत.

तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, सचिन निकम व पोलीस स्टाफ असे सदर ठिकाणी

जाता मिळाले बातमीप्रमाणे इसम हा नवले ब्रीजखाली गाडीसह मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन, त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नावे १) रविंद्र प्रकाश देशमुख, वय-३४ वर्षे, मुळगाव- शाहुनगर,माजलगाव,ता, माजल गाव, जि. बिड, सध्या, वेताळबुवा चौक,नहेगाव, पुणे २) हेमराज शांताराम पाटील, वय-२७ वर्षे, मुं.पो.बोळे,ता.पारुळा, जि.जळगाव सध्या रा. अभिवन कॉलेज रोड, न-हेगाव, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांना ताब्यात घेवुन त्याचेकडे अधिक तपास करता त्यांनी ०८ ते १० दिवसापुर्वी दुर्वाकुर सुष्टी, जेएसपीएम कॉलेज जवळ, न-हे, पुणे याठिकाणी चोरी केली असल्याचे सांगितले.

सदर आरोपींकडे पोलीस कस्टडी मध्ये अधिक तपास करता त्यांनी चोरी केलेली ३०,०००/- रुपये किंमतीची वायर व त्यांनी गुन्हयात वापरलेली ५०,०००/- रुपये किंमतीची मोटार सायकल असा एकुण ८०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर, गणेश मोकाशी हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. प्रविण कुमार पाटील मा. पोलीस उपआयुक्त, परीमंडळ - ०३, श्री.सुहेल शर्मा, मा.सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे श्री. राजेंद्र गलांडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अभय महाजन पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, श्री सचिन निकम, पोलीस उप-निरीक्षक गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, देवा चव्हाण, स्वप्नील मगर, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, राजाभाऊ वेगरे, दक्ष पाटील, विकास पांडुळे, अमोल पाटील, सागर शेडगे, विकास बांदल, अविनाश कोंडे, यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments