PUNE CRIME BEAT - RAJ RATHOD
पुणे : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडत असाल तर जरा काळजी घ्या. कारण भरधाव वाहने वॉकिंग करणाऱ्या नागरिकांना धडकून जाण्याचे अनेक घटना घडताना दिसत आहेत. अशातच १ एप्रिल रोजी सकाळी पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
१ एप्रिल रोजी सकाळी ६:३० वा ते ८ वा दरम्यान, न्याती ईबोनी सोसायटीचे कम्पाऊंडलगत उंड्री,पुणे येथे झालेल्या एका दुर्दैवी अपघातात एका मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, सुजितकुमात बसंतप्रसाद सिंग, वय ४९, राहणार, हांडेवाडी, होंडा सर्विस सेंटरमागे, उंड्री, पुणे, या अपघाताचे काही धक्कादायक फोटो समोर आले आहेत, मिळालेल्या माहितीनुसार मॉर्निग वॉकसाठी घराबाहे पडलेल्या व्यक्तीचा
चारचाकीने धडक दिली. त्या धडकेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला अशी माहिती मिळाली आहे, काळेपडळ पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून, तपास सुरू करण्यात आला होता, तांत्रिक विश्लेषण च्या माध्यमातून व तपास यंत्रणा आणि घटना झालेल्या व परिसरातील येणारा जाणारा संपूर्ण रस्ता व सीसीटीव्हीच्या माध्यमातून, अपघात करून पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेण्यात काळेपडळ पोलिसांना यश मिळाले आहे,
आरोपी नामे समीर गणेश कड वय 32 वर्षे राहणार गंगोत्री कॉम्प्लेक्स, होले वस्ती चौक उंड्री पुणे यास आज रोजी दरडे गाव सोरतापवाडी तालुका हवेली पुणे येथून ताब्यात घेतले आहे,
दाखल गुन्ह्यातील कलम BNS कलम 106,281, मोटार वाहन कायदा कलम 184,119/177,134(A)(B) ( फेटल nexon car )
काळेपडळ पोलिसांनी अपघाताती चार चाकी वाहन जप्त करून, आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments