८ मार्च जागतिक महिला दिनानिमीत्त परिमंडळ ५ मध्ये महिला पोलीसांची भव्य बाईक रॅली. महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

PCB - Raj  Rathod.
पुणे : बेटी बचाओ, बेटी पढाओ  या उपक्रमाला दिनांक २२/०१/२०२५ रोजी दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमीत्ताने ८ मार्च जागतिक महिला दिनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील महिला पोलीसांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने परिमंडळ ५ मधील महिला पोलीसांच्या वतीने दिनांक ०८/०३/२०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता महात्मा फुले सांस्कृतीक भवन, वानवडी ते एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर असे महिला पोलीस बाईक रॅली चे आयोजन करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ ५ मधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यावतीने करण्यात येणार आहे. सदर बाईक रॅलीस सिनेअभिनेता पुष्कर जोग व प्राजक्ता गायकवाड यांचे उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून सकाळी १०:३० वाजता सुरुवात होणार आहे.

बाईक रॅलीचा मार्ग : महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी बँक ऑफ महाराष्ट्र चौक फातिमानगर चौक - डावीकडे वळून भैरोबानाला चौक यु टर्न सरळ ९३ अव्हेन्यू मॉल चौक काळुबाई जंक्शन चौक रामटेकडी वैदवाडी चौक मगरपट्टा चौक गांधी चौक माळवाडी जंक्शन चौक सरळ माळवाडी जंक्शन चौक हडपसर, गाडीतळ रविदर्शन चौक यु टर्न हडपसर गाडीतळ चौक -उजवीकडे वळून तुपे नाट्यगृह चौक उजवीकडे वळून भारत गॅस चौक डावीकडे वळून सरळ एस. एम. जोशी कॉलेज येथे समाप्त.

Post a Comment

0 Comments