मॅफेड्रॉन ( एम.डी.) ड्रग्स तस्करी करणाऱ्याला हडपसर भागातून अटक, १३ लाख १७ हजार ५०० चा मुद्देमाल जप्त,

PUNE CRIME BEAT - Raj Rathod 
पुणे : वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखा यांनी पुणे शहरामध्ये अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांवर, कारवाईचा बडगा उभारला आहे त्याच अनुषंगाने, दि.२७ मार्च २०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे हडपसर पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार सय्यदसाहील शेख यांना मिळालेले बातमीवरुन इसम नामे मोहम्मद नवाब मोहम्मद अख्तर शाह. वय ३३ वर्षे, रा. राजतारा कॉम्पलेक्स, लक्ष्मी कॉलनी सोलापुर रोड, पुणे याच्या ताब्यात एकुण १३लाख १७हजार ५०० रुपये किमतीचा ५८ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे, गु.र.नं.३३९/२०२५, एन.डी.पी.एस. Act अॅक्ट कलम ८ (क), २१ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार, सय्यदसाहिल शेख, संदिप शेळके, चेतन गायकवाड, संदिप जाधव, उदय राक्षे, रविंद्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, अझिम शेख, युवराज कांबळे, आझाद पाटील दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments