PUNE CRIME BEAT
पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथील फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ डॉ.राजकुमार शिंदे यांनी बिबवेवाडी पोलिसांना फसवणुकीच्या गुन्ह्या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश, व पोलिसांना मार्गदर्शन केले पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून साडेपाच लाख रुपये हस्तगत करून फिर्यादी यांना पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या हस्ते परत करण्यात आले,
अधिक माहिती अशी की,
बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, फिर्यादी श्री कुंदन दगडू काटे यांची आरोपी चेतन अनिल गादेकर यांनी. फिर्यादी यांना क्रेडिट कार्डवर एक स्कीम असून त्यातून तुला महिन्याला करोडो रुपयाचा ट्रांजेक्शन करून देतो असा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक केली असल्याबाबत गुन्हा दाखल होता. तरी, दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने, सदर फिर्यादी यांची फसवणूक केलेली साडेपाच लाख रुपये कॅश जप्त करण्यात आली होती. फिर्यादी यांना फसवणुकीच्या गुन्ह्यातील साडेपाच लाखाची रक्कम पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे
यांच्या हस्ते फिर्यादी यांना देण्यात आली आहे. त्यावेळी फिर्यादी यांनी पोलिसांचे आभार मानले.
0 Comments