हातभट्टी दारूचा साठा उध्वस्तकरुन एकास अटक, ३लाख ८हजार ९०० चा मुद्देमाल जप्त.

PUNE CRIME BEAT
पुणे : कळेपडळ  पोलिसांनी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ३लाख ८ हजार रुपये किमतीचा हातभट्टी दारू व दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्य जप्त केला आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील काळेपडळ पोलीस स्टेशन यांनी आपल्या पोलीस स्टेशन कडील पथकांना सूचना दिल्या होत्या त्याचप्रमाणे पोलिसांना माहिती मिळाली होती की आदर्शनगर, हांडेवाडी ट्रेड पार्क जवळ, उरुळी देवाची, पुणे येथे इसम नामे अजित संतोष जयस्वाल रा. काळेपडळ, हडपसर, पुणे हा एका पत्र्याचे शेड मध्ये गावठी हातभट्टी दारु व दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आदर्श नगर हांडेवाडी या ठिकाणी ठेवलेले आहे पोलिसांनी छापा मारून यासंदर्भात जयस्वाल याला ताब्यात घेऊन सर्व मुद्देमाल ताब्यात घेतले आहे, अजित संतोष जयस्वाल याच्यावर काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की.
पुणे : काळेपडळ पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे, सूचना पोलीस पथकांना दिले होते त्याच अनुषंगाने, दि.०४/०३/२०२५रोजी काळेपडळ पोलीस स्टेशन कडील सहा पोलीस निरीक्षक गायकवाड, सपोफौ रमेश गरुड, स्टाफ असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार दाऊद सय्यद यांना गोपनीय बातमी मिळाली की, आदर्शनगर, हांडेवाडी ट्रेड पार्क जवळ, उरुळी देवाची, पुणे येथे इसम नामे अजित संतोष जयस्वाल रा. काळेपडळ, हडपसर, पुणे हा एका पत्र्याचे शेड मध्ये गावठी हातभट्टी दारु काढण्यासाठी लागणारे साहीत्य गोळा करुन, वाहतुक करुन गावठी हातभट्टी दारु विक्री करीत असलेची बातमी मिळाल्याने बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मानसिंग पाटील व स्टाफ यांनी आदर्शनगर, हांडेवाडी ट्रेड पार्क जवळ, उरुळी देवाची, पुणे येथे सापळा रचून हातभट्टीवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाई मध्ये, अजित संतोष जयस्वाल यास ताब्यात घेवून, तयार हातभट्टीच्या दारुने भरलेले एकुण ४४ कॅनमध्ये भरुन ठेवलेली १हजार ५४० लिटर गावठी दारुचा साठा एकुण ३लाख ८हजार ९००
रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन साठा करणे करीता बनविण्यात आलेले पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आले आहे.

या संधर्भात काळेपडळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक शेटे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ डॉ. श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री. धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक गायकवाड, सपोफौ रमेश गरुड, पोलीस अंमलदार दाऊद सय्यद, अमोल फडतरे, संजय देसाई, परशुराम पिसे, कांबळे, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी, शाहिद शेख यांनी केली.

Post a Comment

0 Comments