बांधकाम व्यवसायिकाला १० लाखाची खंडणी मागणाऱ्याला, पुष्पमंगल चौक बिबवेवाडी येथून अटक.

PUNE CRIME BEAT - Raj Rathod  
पुणे : बिबवेवाडी येथे राहणाऱ्या बांधकाम व्यवसायिकाला खंडणी मागणाऱ्या एकास बिबवेवाडी पोलिसांनी पुष्पमंगल कार्यालय बिबवेवाडी येथून ताब्यात घेतले आहे, खंडणी मागणारा इसम हा,फिर्यादी यांच्या कडे ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याचे माहिती मिळाली आहे, पोलीसांनी साध्या वेशात जावून सदर खंडणीखोरास खंडणीची रक्कम घेताना रंगेहात पकडले, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे, 

या संदर्भात अधिक माहिती अशी की,
बिबवेवाडी पुणे येथील व्यवसायीक गौरव प्रमोद दुगड, व्यवसाय बांधकाम,  रा. वसंतबाग सोसायटी, बिबवेवाडी पुणे यांना त्यांचे मोबाईलवर त्यांचेकडील ड्रायव्हर अमित दत्तात्रय थोपटे, रा. गुरूदत्त अपार्टमेंट बालाजीनगर, धनकवडी पुणे याने तक्रारदार यांचे वडीलांचे मोबाईल मधून अश्लिल मॅसेज स्वतःचे मोबाईलमध्ये पाठवून त्याचे स्क्रिनशॉट काढले व ते स्क्रिनशॉट तक्रारदार यांना पाठवून त्यांची बदनामी करण्याची व कुटुंबाला जिवे ठार मारणेची धमकी देवून १० लाख रुपयाची खंडणी मागितल्याची तक्रारदाराने दि.२८ मार्च ला तक्रार दिली.

मिळालेल्या तक्रारीवरून बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, व तपास पथकाने खात्री करून तात्काळ सापळा रचला. त्याच वेळी आरोपीने तक्रारदार यांना फोनवर मॅसेज करून खंडणी मागितली व खंडणीचे पैसे घेवून पुष्पा हाईट्स, दुसरा मजला, पुष्पमंगल चौक, पुणे येथे येण्यासाठी सांगितले.

बिबवेवाडी पोलिसांनी त्या ठिकाणी खंडणीखोराला पकडण्यासाठी सापळा रचला  व खंडणीखोरास देण्यासाठी डमी व चलनी नोटा तयार ठेवून आरोपीस मोबाईल फोनद्वारे पैसे जमा केल्याचे मॅसेज पाठवून दिले. त्यावर आरोपी वरील ठिकाणी खंडणीचे पैसे घेण्यासाठी येणार असल्याची खात्री झाल्याने सदरबाबत राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ यांना माहिती देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीसांनी साध्या वेशात जावून सदर खंडणीखोरास खंडणीची रक्कम घेताना रंगेहात पकडले. त्यास त्याचे नाव पता व खंडणी मागणेचे कारण विचारले. त्याने मार्केटमध्ये उधारी झाली असल्याने व देणे जमत नसल्याने खंडणी मागितल्याचे सांगितले. आरोपीने स्विकारलेली खंडणीची रक्कम पंचनामा करून व आरोपीस ताब्यात घेतले. सदर घटनेबाबत बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 आरोपीस लागलीच अटक करून न्यायालयात रिमांड रिपोर्टसह हजर केले असता मा. न्यायालयाने दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे, तपास पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक अशोक येवले, पोलीस हवा. संजय गायकवाड, संतोष जाधव, पो.शि. सुमित ताकपेरे, प्रणय पाटील, ज्योतिष काळे, रक्षित काळे, शिवाजी येवले, विशाल जाधव, दत्ता शेंद्रे, निलेश पाटील यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments