PUNE CRIME BEAT, RAJ RATHOD.
पुणे शहरात दिवसेंदिवस वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते, तरी देखील बरेच वाहन चालक वाहतुकीचे नियम मोडताना दिसून येतात, त्यामध्ये राँग साईड ड्रायव्हिग, सीट बेल्ट परिधान न करणे, ट्रिपल शीट दुचाकी वाहन चालवणे व मद्यपान करून वाहन चालवणे, यासारख्या नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शहरात, दि.१/३/२०२५, रात्री १० ते १२ रोजी नाकाबंदी करण्यात आली होती, नाकाबंदी दरम्यान पुणे शहरातील एकुण ७८ महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी राबवुन एकूण २,८५३ वाहने तपासुन, वाहतुक नियमांचे उल्लघंन करणा-या ५१४ वाहनांवर कारवाई करून एकुण ७,४६,३५० /- रू. दंड वसुल करण्यात आला आहे. नाकाबंदी दरम्यान एकूण ७२ वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.
सदर नाकाबंदीकरीता पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील परिमंडळीय पोलीस उप-आयुक्त, विभागीय सहायक पोलीस आयुक्त, ३९ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक गुन्हे, तपास पथकातील अधिकारी, चौकी अधिकारी, वाहतुक शाखा, गुन्हे शाखा असे संयुक्तपणे मिळुन एकुण ९३ पोलीस अधिकारी व १८७२ पोलीस अमंलदार यांनी सहभाग घेवून प्रभावीपणे नाकाबंदी केली.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर सर्व अपर पोलीस आयुक्त, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व परिमंडळीय पोलीस उपायुक्त, सर्व विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस स्टेशन कडील अधिकारी / अमंलदार तसेच वाहतुक शाखा व गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे कारवाई केलेली आहे.
पुणे शहरातील सर्व नागरिकांना पुणे पोलीस दलातर्फ आवाहन करण्यात येते कि, सर्वानी वाहतुक नियमांचे पालन करुन, वाहतुक शिस्त पाळावी.
0 Comments